वरप येथे माणुसकीचा सलुन छोट्यातून मोठा आंनद!
कल्याण (संजय कांबळे) : वरप येथे भूषण सोनवणे या सलुन व्यावसायिकाने व्यवसाय करून जगताना समाजाचं आपलं देणं लागतं या सेवा भावनेने.परिसरातील लहान मुलांचे केस कापले होते. हे कळताच उल्हास बचाव कृती समितीचे अश्विन भोईर यांच्या सांगण्यावरून अनाथ मुलांचे केस कापले यातून त्याला मोठा आंनद मिळाला.
कोरोनाने सर्वांचेच वांदे करुन ठेवले आहे. पोटाची खळगी कशी भरायची हा मोठा प्रश्न गोरगरिबांना पडला आहे. त्यामुळे केस कापने अवघड झाले आहे.
वरप येथील उल्हास बचाव कृती समितीचे अश्वनक भोईर यांनी गुरवली येथील आईची सावली या अनाथ आश्रमातील लहान मुलांचे केस कापले नाही अशी माहिती मिळाली छोटीशी का होईना समाजसेवा घडावी म्हणून त्याने गुरवली येथील राईट्स ऑफ वुमेन (आईची सावली) या लहान मुलांच्या अनाथ आश्रमात जाऊन सर्व तीस लहान मुलांचे गेले काही महिने मोफत केस कापून देत आहे .
यातून त्याला जो समाधान मिळाला तो अमूल्य आहे.
.... मानव सेवा हिच ईश्वर सेवा आहे असे यावेळी भूषण सोनावणे यांनी सांगितले.



No comments:
Post a Comment