Tuesday, 8 December 2020

शिवसेना प्रणित महाराष्ट्र कंत्राटी आणि जनरल कामगार सेना अध्यक्ष कुणाल सरमळकर यांच्या सौजन्याने आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद !

शिवसेना प्रणित महाराष्ट्र कंत्राटी आणि जनरल कामगार सेना अध्यक्ष कुणाल सरमळकर यांच्या सौजन्याने आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद !


मुंबई,(समीर खाडिलकर/शांत्ताराम गुडेकर) :
            रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरीमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशन्टचे प्राण वाचण्यास मदत होते. तसंच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते. आपण रक्ताची निर्मिती करू शकत नाही. त्यामुळे रक्तदान करणे हा रक्त मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे रक्तदान करून गरजूंना मदत करणे महत्त्वाचे आहे  प्रत्येक नागरिक सीमेवर जाऊन लढू शकण नाही मात्र देश संरक्षणासाठी रक्तदान करुन आपले कर्तव्य सहज पार पाडू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्या  संकल्पनेनुसार संसदीय कार्य व परिवहनमंत्री माननीय अँड. डॉ. अनिल परब  यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रणित महाराष्ट्र कंत्राटी आणि जनरल कामगार सेना अध्यक्ष कुणाल सरमळकर यांच्या सौजन्याने रक्तदान शिबीर मेरी गोल्ड हॉल, हनुमान टेकडी गेट नं. १, सांताक्रूझ (पूर्व) येथे पार पडले. या रक्तदान शिबिराला सर्व कामगारवर्ग तसेच अन्य सहकारीवर्ग उपस्थिती होते. अनेकांनी रक्तदान करून... करुनी दान रक्ताचे, फेडुया ऋण समाजाचे हा संदेश दिला.

No comments:

Post a Comment

राजगुरूनगरच्या 'अश्विनी राजेंद्र पाचारणे' यांना "सहकार रत्न" पुरस्कार !

राजगुरूनगरच्या 'अश्विनी राजेंद्र पाचारणे' यांना "सहकार रत्न" पुरस्कार ! पुणे, स्नेहा उत्तम मडावी - खेड येथील र...