Tuesday, 8 December 2020

विद्याविहार येथील पुलाचे काम झाल्यास पूर्व आणि पश्चिम वाहतूक कोंडी टळेल-खा.मनोज कोटक

विद्याविहार येथील पुलाचे काम झाल्यास पूर्व आणि पश्चिम वाहतूक कोंडी टळेल-खा.मनोज कोटक



मुंबई,(शांत्ताराम गुडेकर) :
     ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी आज मध्य रेल्वे आणि मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यासमवेत विद्या विहार आरओबी प्रकल्पाची संयुक्त साईट भेट घेतली. विद्याविहार चा हा आरओबी एलबीएस मार्गला मनपा 'एन' वॉर्डमधील आरसी मार्गाशी जोडेल. उत्तम शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांचे केंद्र असलेल्या विद्याविहारला पूर्व आणि पश्चिम भाग जोडण्यासाठी आणि वाहतूक कोंडी न होता गतीने चालण्यासाठी या पुलाची गरज आहे. सध्या लोकांना घाटकोपर किंवा कुर्ला येथून फिरून पूर्वे हून पश्चिमेला जावे लागते. तेथील कोंडी मुळे किमान एक तासाचा कालावधी अधिक लागतो.

कोटक यांच्या समवेत मध्य रेल्वेचे अधिकारी तसेच मुख्य अभियंता पूल - एमसीजीएम, मुख्य अभियंता रोड एमसीजीएम, एएमसी एन - वॉर्ड, वरिष्ठ निरीक्षक वाहतूक आणि वरिष्ठ निरीक्षक टिळक नगर पोलीस स्टेशन, आमदार पराग शाह, नगरसेविका बिन्दु त्रिवेदी, जिल्हाध्यक्ष अशोक राय आणि मुंबई चे सचिव प्रवीण छेडा हे पाहणी दौऱ्यात उपस्थित होते. त्यांनी आरओबीच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. .रेल्वे येथे ९९.३५ लांबीचा सर्वात मोठा गर्डर लवकरच बसवणार आहे. त्यानंतर हा पूल पूर्णत्वाला नेण्याचे काम लवकर होईल. तसेच प्रवाशांच्या सुविधेसाठी विद्याविहार स्थानकात पूर्व आणि पश्चिम भागात नविन तिकिट विक्री ऑफिस तयार असून लवकरच ते सुरू करण्यात येईल असेही यानिमिताने सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”.

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला खंडाळा घाट आज आपल्या दैनंदिन प्रवासाच...