Tuesday, 8 December 2020

दिव्यांगाच्या अर्थ सहाय्य वाटपात भ्रष्टाचार ! दिव्यांगाचा आरोप

दिव्यांगाच्या अर्थ सहाय्य वाटपात भ्रष्टाचार ! दिव्यांगाचा आरोप


"नोकरीला असलेल्या दिव्यांगाना दिले अर्थसहाय्य" चौकशीची मागणी

कल्याण, प्रतिनिधी - दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या अर्थ सहाय्य वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दिव्यांगांनी केला आहे. नोकरी करणाऱ्या दिव्यांगाना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे अर्थ सहाय्य दिले असून              
खऱ्या लाभार्थ्यांना या पासून वंचित ठेवले आहे. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी दिव्यांग पारसनाथ कौल यांनी केली आहे.
महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या अर्थ सहाय्याचे वाटप 2017 साली करण्यात आले. 65 जणांना प्रत्येकी पाच लाख रुपये दिले गेले. त्यापैकी बहुतेक जण हे नोकरी करणारे आहे. ही माहिती कौल यांनी माहितीच्या अधिकारात  उघड केली आहे. कौल यांना अर्थ सहाय्य मिळालेले नाही. त्यांनी त्यासाठी महापालिकेकडे अर्ज केला होता. त्यांच्यासह दिव्यांग अशोक यादव, ज्योती यादव, कल्पना शिंदे, सतीश शिंदे, भारती शहा हे लाभार्थी खरे असून ते लाभापासून वंचित  आहेत. त्यांच्यावर अन्याय झाला आहे.
कौल हे समाज कल्याण अधिकाऱ्यांना भेटले असता त्यांनी हे प्रकरण जुने आहे. महापालिकेने 2018 साली नियम बदलला आहे. त्यामुळे आत्ता कुठेही गेला तरी पूर्व लक्षी प्रभावाने लाभ देता येणेे शक्य नाही. भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करावेत. त्याची शहा निशा केली जाईल.
महापालिकेने कौल यांना दिलेल्या माहिती अधिकारातील माहितीत प्रत्येक लाभार्थ्यांच्या नावापुढे पाच लाखा ऐवजी पन्नास लाख रुपये अशी रक्कम वाटप केल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी प्रशासनाकडून असे सांगण्यात आले की, लिपिक महिला आजारी असल्याने तिच्याकडून ही चूक झाली आहे.

No comments:

Post a Comment

कोकण सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते अजित गोरुले "मी उद्योजक सन्मान" पुरस्काराचे मानकरी !

कोकण सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते अजित गोरुले "मी उद्योजक सन्मान" पुरस्काराचे मानकरी ! मुंबई (शांताराम गुडेकर) :        ...