कोकण सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते अजित गोरुले "मी उद्योजक सन्मान" पुरस्काराचे मानकरी !
मुंबई (शांताराम गुडेकर) :
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेले श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील मु. पो. मारळ गावचे मूळ रहिवाशी नोकरी, व्यवसाय निमित्त विलेपार्ले (पूर्व) मुंबई येथे वास्तव्यास असलेले कोकण सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते श्री.अजित गोरुले (अध्यक्ष -कुणबी उद्योजक लाॕबी) यांचा मी उद्योजक होणारच यांच्यातर्फे सन २०२५ चा "मी उद्योजक सन्मान" पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर ग्लोबल कोकणचे श्री.संजय यादवराव आणि मी उद्योजक होणारचचे प्रमुख निलेश मोरे उपस्थित होते. व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य उप मुख्यमंत्री सन्मा. एकनाथ शिंदे, आमदार प्रसाद लाड, विकासक हावरे, संतोष पाटील आदी मान्यवर यांनी हजेरी लावून उपस्थित उद्योजक आणि अन्य नवीन उद्योजक यांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. श्री.अजित गोरुले सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षे काम करत असताना मराठी तरुणांना व्यवसाय मार्गदर्शन करीत आहेत. कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका संगमेश्वर, कुणबी युवक मंडळ आणि संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतपेढी लि मुंबई या संस्थेच्या माध्यमातून त्यांचे कार्य गेली अनेक वर्षे सुरू आहे. श्री.गोरूले यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन मी उद्योजक होणारच संस्थेचे प्रमुख श्री. निलेश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. सदर समारंभ मुंबई शेअर बाजार इमारतीत मंगळवारी थाटामाटात पार पडला. श्री.अजित गोरुले यांना बहुमान मिळाल्यानंतर त्यांचे अनेक मान्यवर व्यक्तींनी, मंडळ, संस्था, ग्राम विकास मंडळ, पत्रकार, वृत्तपत्र लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्र परिवार यांनी अभिनंदन केले. प्रामुख्याने नवी मुंबई माजी उपमहापौर श्री. अविनाश लाड, कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ संगमेश्वर मुंबई सरचिटणीस श्री. शांताराम गोरुले, दै. अग्रलेख चे मुंबई /कोकण विभागीय संपादक एस. एल. गुडेकर (आंगवली -रेवाळे वाडी ), कुणबी सहकारी बँक संचालक श्री.पी. डी ठोंबरे, मुंबई विद्यापीठ सेवा निवृत्त सहा. कुल सचिव श्री भालचंद्र सीताराम गोरीवले यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment