Saturday, 5 December 2020

गावतंटे टाळण्यासाठी पेसा ग्रा.पं. मधील अंगणवाडी पदभरती पध्दतीत बदल करावा - 'चेतनसिंह पवार'

गावतंटे टाळण्यासाठी पेसा ग्रा.पं. मधील अंगणवाडी पदभरती पध्दतीत बदल करावा - 'चेतनसिंह पवार'


मुरबाड (मंगल डोंगरे) : बुधवार दि. २ डिंसेबर २०२० रोजी महिला व बाल विकास मंत्री नामदार ॲड. यशोमती ठाकुर यांना निवेदनाव्दारे पेसा ग्रा.पं. मधील सदोष अंगणवाडी पदभरती पध्दतीमध्ये बदल करण्यासंर्दभात पर्यावरण काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस चेतनसिंह पवार यांनी मागणी केली. 


सद्दस्थितीला पेसा ग्रामपंचायतीमध्ये अंगणवाडी पदभरती मध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनीसेविका ह्या पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. सदरील पदभरती पध्दतीमध्ये अर्ज स्विकृती नंतर छाणणी केली जावुन ज्या अर्जदारांना दहावी मध्ये ६० % च्यावर गुण आहेत त्या सर्वांचे अर्ज ग्रामसभेसमोर ठेवण्यात येतील व त्यानंतर ग्रामसभा योग्य अर्ज स्वीकारेल. सदरील प्रक्रिया सदोष असुन भरती असलेल्या गावामध्ये मोठ्याप्रमाणात गावतंटे होवुन हाणामारीचे प्रकार देखील होवु शकतात तसेच सरपंच-कमिटी योग्य सक्षम उमेदवार डावलुन त्यांच्या बाजुचा उमेदवार निवडु शकते त्यामुळे सदरील सदोष भरती पध्दत तात्काळ रद्द करावी. व बिगर पेसा ग्रामपंचायत मधील भरती पध्दतीची अंमलबजावणी करावी. असे मत यावेळी चेतनसिंह पवार यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

डॉ.भारती बावदाने व विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १२३ मध्ये शिवसेना शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

डॉ.भारती बावदाने व विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १२३ मध्ये शिवसेना शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त...