Saturday, 5 December 2020

केडीएमसीत कोरोना बाबतच्या उपाययोजनासाठी बैठक !

केडीएमसीत कोरोना बाबतच्या उपाययोजनासाठी बैठक !


कल्याण – मृत्युदर शुन्यावर आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया असे उद्गार पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. कोरोनाची संभाव्य दुसरी लाट, महापालिका करत असलेल्या उपाययोजना, लसीकरण याबाबत आयएमए कल्याण , आयएमए डोंबिवली , निमा, कॅम्पा यांचे डॉक्टरांसमवेत संपन्न झालेल्या बैठकीत त्यांनी हे उद्गार काढले. कोरोना रुग्णांची संख्या आता जरी नियंत्रणात असली तरी मिशन बिगेन अंतर्गत सर्वत्र वर्दळ वाढल्यामुळे रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिका आता ॲन्टीजेन टेस्ट बरोबरच आरटी पीसीआर टेस्ट देखील करीत असून महापालिका क्षेत्रात दररोज सुमारे १७०० – २००० चाचण्या होत आहेत.

आता रेल्वे स्थानकांवर देखील टेस्टिंग सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.छोटे दुकानदार, भाजीवाले, किराणा दुकानदार, बांधकाम कामगार, हॉटेलमधील कामगार यांची ताप आल्यास किंवा तत्सम लक्षणे दिसल्यास त्वरीत कोविडची टेस्ट करण्यास सांगावे, अशी विनंती पालिका आयुक्त यांनी उपस्थित डॉक्टरांना दिली.त्याचप्रमाणे नॉन कोविड हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णाला ॲडमिट केल्याचे लक्षात आल्यास त्यांचावर कारवाई केली जाईल, असाही इशारा आयुक्तांनी यावेळी दिला.कोविड साथीसाठी संभाव्य लसीकरण लक्षात घेवून महापालिका क्षेत्रातील शितगृहे(कोल्ड स्टोरेज) आयडेंटिफाय करुन ठेवावे, त्याचप्रमाणे व्हॅक्सिनेटर्सची माहिती संकलित करुन ठेवावी, अशा सुचना वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी यावेळी उपस्थितांना दिल्या.

अजून कोविडचे संकट संपले नाही, दुसरी लाट येणार नाही याची अपेक्षा करु या, फॅमिली डॉक्टर कोविड फायटर या संकल्पनेस कोविड साथीमध्ये सर्व डॉक्टरांचे बहुमोल सहकार्य मिळाले, यापुढेही आपले सहकार्य मोलाचे आहे, असे उद्गार आयुक्तांनी सर्व डॉक्टरांना संबोधितांना काढले. यावर आमचे सहकार्य कायम राहील असे आश्वासन आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी दिले. सदर बैठकीत साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैदयकीय अधिकारी डॉ. सुहासिनी बडेकर, बाई रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैदयकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम टिके, महापालिकेचे डॉ. निंबाळकर, डॉ. सरवणकर, निमाच्या अध्यक्षा डॉ. गायत्री कुलाली  इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

गौरीपाडा परिसरातील पथदिव्यांच्या 'स्फूर्ती फाउंडेशन'च्या मागणीला यश !

गौरीपाडा परिसरातील पथदिव्यांच्या 'स्फूर्ती फाउंडेशन'च्या मागणीला यश ! कल्याण, प्रतिनिधी - गौरीपाडा परिसरातील नागरीकांच्य...