Thursday, 3 December 2020

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत !

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत !

मुंबई - महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोनच दिवसाचे अधिवेशन होत आहे. कामकाज सल्लागार समितीच्या विधानभवन येथे आज (गुरुवारी) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत दोनदिवसीय अधिवेशन घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज मंत्री ॲड.अनिल परब, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, दिलीप वळसे-पाटील, सुभाष देसाई, अनिल देशमुख, सतेज पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह विधानपरिषद आणि विधानसभा सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नालासोपारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी.....

नालासोपारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब  ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी..... नालासोपारा, प्रतिनिधी ता, २३ :- शिवसेना मुख्य...