Friday, 4 December 2020

अनधिकृत बांधकामांवर कारवाई !.

अनधिकृत बांधकामांवर कारवाई !


ठाणे, प्रतिनिधी : दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील दहा अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाई केली आहे. जेसीबीच्या साहाय्याने ही सर्व बांधकामे पाडण्यात आली आहेत. दिवा प्रभाग समिती क्षेत्रात पालिका पथकाने बेकायदा बांधकामांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. दिवा प्रभाग समिती क्षेत्रात बेकायदा बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी ठाणे महापालिका प्रशासनाकडे येत होत्या. या तक्रारींची दखल घेत ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी अशा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दिवा प्रभाग समिती क्षेत्रात पालिका पथकाने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईत ‘दोस्ती रेंटल’च्या पाठीमागील अझीम खान आणि परवेज खान यांच्या दहा खोल्यांचे बेकायदा बांधकाम तोडण्यात आले. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनानुसार दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

No comments:

Post a Comment

नालासोपारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी.....

नालासोपारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब  ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी..... नालासोपारा, प्रतिनिधी ता, २३ :- शिवसेना मुख्य...