Friday, 4 December 2020

भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते ज्ञानेश्वर पष्टे यांची भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण किसान मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड !

भाजपाचे  निष्ठावंत कार्यकर्ते ज्ञानेश्वर पष्टे यांची भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण किसान मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड !


मुरबाड (मंगल डोंगरे) : तालुक्यातील एक जुनेजाणते व भारतीय जनता पार्टी पक्षाचे सुरूवातीपासुनचे  निष्ठावंत कार्यकर्ते ज्ञानेश्वर मेघराज पष्टेसर यांची ठाणे जिल्हा ग्रामीणच्या किसान मोर्चाच्या उपाध्यक्षपदी  निवड करण्यात आली.
भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील व मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितित महाराष्ट्राचे माजी मंत्री व भाजपाचे जेष्ठ नेते जगन्नाथ पाटिल यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देवून त्यांची निवड करण्यात आली. देशात जनसंघापासून ते भाजपा पक्षाची स्थापना झाल्यापासुन ते भारतीय जनता पार्टीचे प्रमाणिकपणे काम करत आहेत. आजतागायत त्यानी ४५ वर्षे भारतीय जनता पार्टीचे सेवेच्या दृष्टिकोनातून समर्पित भावनेने काम केले आहे. भाजपाचे एक साधे कार्यकर्त, भाजपा पक्षाच्या राज्य कार्यकारणीत महाराष्ट्र राज्याचे सदस्य अशी पदे त्यानी भूषविली आहेत. या कार्यक्रमावेळी कल्याण (प) मा. आमदार नरेंद्र पवार, ठाणे जिल्हा ग्रामीण भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष जयराम भोईर, भाजपा मुरबाड तालुक़ा अध्यक्ष जयवंत सूर्यराव, भाजपा जिल्हा सरचिटणीस नितिन मोहपे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नालासोपारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी.....

नालासोपारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब  ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी..... नालासोपारा, प्रतिनिधी ता, २३ :- शिवसेना मुख्य...