6 डिसेंबर 2020 रोजी शांतता व सुव्यवस्था भंग करण्याऱ्यांसाठी मनाई आदेश लागू !
ठाणे : 06 डिसेंबर 2020 रोजी महापरीनिर्वाण दिन साजरा होणार आहे. तसेच सदर दिवशी बावरी मशिद पतन झाल्यामुळे ठाणे जिल्हा कार्यक्षेत्रातील गणेशपुरी, भिवंडी तालुका, पघडा, शहापुर, कसारा, वासिंद, किन्हवली, मुरबाड, कल्याण तालुका, कुळगाव व टोकावडे पोलीस स्टेशन असे एकूण 11 पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये शांतता व कायदा व सुव्यवस्था आबाधित रहावी, समाज कंटक व गुंड प्रवृत्तीचे इसम यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणे सोयीचे व्हावे. यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये दि. 06 डिसेंबर 2020 रोजीचे 24:00 वा.पर्यंत खालील बाबीसाठी मनाई आदेश लागू करण्यात आले आहे.
मनाई आदेश लागू असल्याने या काळात शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, सोटे, बंदूका, सुरे, लाठया अथवा काठया अथवा शारीरीक इजा करण्यासाठी वापरता इतर कोणतीही वस्तु बाळगणे. कोणताही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे,दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा जकावयची उपकरणे किवा साधने बाळगणे, जमा करणे किवा लोकांतप्रचार करणे,व्यक्तीचे प्रेत किंवा आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्यवाजविणे,यामुळे सभ्यता अगर नीती यास धक्का पोहोचेल अशा किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशा प्रकारची भाषणे तत्वे.हावभाव करणे, सोंग आणणे किंवा चित्रे, चिन्हे, फलक किंवा कोणतीही जिन्नस किंवा वस्तु तयार करणे किंवा लोकांतप्रचार करणे. पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे.
सदरची आदेश प्रेतयात्रा, लग्नाची मिवणूक तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांच्या लेखी परवानग्या घेवून काढलेल्या मिरवणूकीस लागू असणार नाही. तसेच सदरचा आदेश केंद्र व राज्य सरकारच्या नोकरीत असलेल्या व त्यांचे वरिष्ठांचे आदेशानुसार अगर कर्तव्याच्या किंवा अपंगत्वामुळे लाठी, काठी बाळगणे आवश्यक आहे अशांना लागू असणार नाही. असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे
No comments:
Post a Comment