सुरेश प्रभू, निलेश राणे यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत एक हजार महिलांना शिलाई मशीन, मुलींना होणार सायकलचे वितरण !
रत्नागिरी । प्रतिनिधी : सिंधुदुर्गातील जन शिक्षण संस्थानतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार महिलांना शिलाई मशीन आणि सायकल बँक अंतर्गत 100 शाळांतील एक हजार मुलींना सायकलचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री आणि शेर्पा प्रधानमंत्री सुरेश प्रभू हे उदघाटक असून माजी खासदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर मानव साधन विकास संस्थाच्या अध्यक्ष सौ. उमा प्रभू वेबिनारद्वारे उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम उद्या ३ डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता टीआरपी येथील अंबर हॉल येथे होणार आहे. हि माहिती जन शिक्षणचे उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. अंबर हॉलमध्ये पुणे विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कुलदीप सिंग, माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, माजी आमदार बाळ माने, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू व अॅड. दीपक पटवर्धन, जनशिक्षण संस्थानचे अध्यक्ष डॉ. शरद सावंत, माजी जि. प. अध्यक्ष राजेंद्र महाडिक व उद्योजक राजू सावंत उपस्थित राहणार आहेत.
माजी मंत्री प्रभू यांच्या संकल्पनेतून मानव साधन विकास संस्था कार्यरत आहे. गेली 20 वर्षे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई, पुण्यातील प्रतिनिधींना घेऊन महिला, शेतकरी, युवक, माजी सैनिक, मच्छीमार, वंचितांना सोबत घेऊन काम करत आहे. जनशिक्षण संस्थानमार्फत दोन्ही जिल्ह्यातील सत्तर हजार युवक, युवतींना प्रशिक्षित केले. दहा हजार पेक्षा अएधिक लोकांना कायमस्वरूपी रोजगार देऊन उद्योजक म्हणून नावारुपाला आणले. परिवर्तन केंद्राच्या पुढील टप्प्यात 'लोकल ते व्होकल' तसेच 'एक जिल्हा एक उत्पादक' या संकल्पनेतून पुढील वाटचाल केली जाणार आहे. कोकणला कशी फायद्याची संधी मिळून अर्थकारण बदलेल याकडे श्री. प्रभू यांचे लक्ष असते. याच माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे. पत्रकार परिषदेला या वेळी रवींद्र वाडेकर, परिवर्तन केंद्राचे सुधीर पालव उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यात 125 परिवर्तन केंद्र केली आहेत. एका परिवर्तन केंद्रात दहा गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन देण्याचा उपक्रम व भौगोलिकदृष्ट्या विचार करता ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थिनींना एक हजार सायकलचे वितरण.
No comments:
Post a Comment