Wednesday, 13 January 2021

कल्याण तालुक्यातील ऐकवीस ग्रामपंचायतीपैकी सर्वाधिक चुरस म्हारळ, कांबा आणि बेहरे ग्रामपंचायतीत.?

कल्याण तालुक्यातील ऐकवीस ग्रामपंचायतीपैकी सर्वाधिक चुरस म्हारळ, कांबा आणि बेहरे ग्रामपंचायतीत.?


कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी शेकडो उमेदवार निवडून रिंगणात उतरले असले तरी तालुक्यातील सर्वाधिक निवडणूकीची रणधुमाळी म्हारळ, कांबा आणि बेहरे ग्रामपंचायतीत पहायला मिळत असून काही उमेदवारांमध्ये चुरस देखील येथेच होणार अशी परिस्थिती आहे.
कल्याण तालुक्यात २१ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या आणि अनेकानी निवडणुकीत उड्या मारल्या. शेवटच्या दिवशी कल्याण तालुक्यातील वरप ग्रामपंचायत एकमेव बिनविरोध झाली. परंतु इतर २० ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात कोणत्याही नेत्याला अथवा पुढचा-याला यश आले नाही. त्यामुळे अखेरीस निवडणूकीला चिन्ह वाटल्यानंतर खरी सुरुवात झाली. काही मंडळी खरेच गाव विकासासाठी निवडणूक मैदानात उतरले तर काही एकमेकांची जिरवण्यासाठी, बदला घेण्यासाठी, तर आपल्याला कोणीतरी पैसे देईल मग माघार घेऊ ही सौदेबाजी न झाल्याने निवडणूक लढविली जात आहे. अर्थात हे कोणी उघड बोलत नाही तरीही हे शंभर टक्के खरे आहे. काही ग्रामपंचायतीमध्ये वर्षे अन वर्षे पदे भोगली तरी आता पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. तर अनेक गावात नवीन तरुण पिढी निवडणूकीला सामोरे जात आहेत.
कल्याण तालुक्यात वरप ग्रामपंचायत बिनविरोध झाली असल्याने म्हारळ, कांबा, रायते पिंपळोली, घोटसई, म्हसकळ, गुरवली, निंबवली राया ओझर्ली, मानवली, गोवेली बेहरे वडवली वाकळण, आपटी मांजर्ली उतणे चिंचवली, जांभूळ, सांगोडा कोंढेरी, नडगाव दांणबाव, आदी २० ग्रामपंचायती निवडणूक होत आहे. असे असले तरी खरी लढत किंवा सर्वाधिक लक्ष लागलेले आहे ते म्हारळ, कांबा आणि बेहरे ग्रामपंचायतीतकडे,
कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या म्हारळ आणि बेह रे या ग्रामपंचायती मागील वर्षी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या ताब्यात होत्या. तर औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाणारी कांबा ग्रामपंचायत भाजपकडे होती. म्हारळ आणि बेहरे ग्रामपंचायतीत १७ सदस्य असून म्हारळ मध्ये ४३ तर बेहरे ग्रामपंचायतीत ४० आणि कांबा ग्रामपंचायत १३ जागांसाठी २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतीच्या काही वार्डात हेच उमेदवार शंभर टक्के निवडून येणार असे बोलले जात आहे तर काही ठिकाणी मात्र चुरशीची लढत होणार आहे असे चित्र आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत बॅनरबाजी, गाठीभेटी, हात जोडने, पायावर माथा टेकवणे घोषणा देणे, घरोघरी जाऊन प्रचार करणे सुरू आहे. दिवसभर थकलेल्या कार्यकर्त्यांची सोय आदीचां झंजावात गावा गावात सुरू आहे. रविवारी मात्र निवडणूक प्रचार शिगेला पोहचणार ऐवढे नक्की, तसेच निवडणूकीत सर्वांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे असे आवाहन काही सामाजिक संस्था व संघटना करीत आहेत..

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...