Saturday, 23 January 2021

जि.प., पं.स प्रमाणे राज्यातील ग्राम पंचायत सरपंच पदाचे आरक्षण काढा !!

जि.प., पं.स प्रमाणे राज्यातील ग्राम पंचायत सरपंच पदाचे आरक्षण काढा !!


**सभापती श्रीकांत धुमाळ यांची नाना पटोळे यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी**

मुरबाड (मंगल डोंगरे) : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समितीचे सभापती पदाचे आरक्षण जसे अडीच वर्षाच्या मुदतीनंतर सोडत पद्धतीने काढले जाते.त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील ग्राम पंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण दर अडीच वर्षानी नव्याने काढले जावे.तशी तरतूद करण्यात यावी.जेणे करून जास्तीत जास्त नवतरुणांना त्याचा फायदा होवून गावचा विकास साधला जाईल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुरबाड पंचायत समितीचे सभापती श्रीकांत धुमाळ यांनी एका लेखी निवेदनाद्वारे विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांचेकडे मागणी केली आहे.


                     गावचा विकास काय असतो,तो कसा करावयाचा असतो. याचा प्रत्यक्ष 10  ते 15 वर्षाचा अनुभव असलेले मुरबाड शहरा पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देवपे ग्राम पंचायत चे अनुभवी सरपंच श्रीकांत धुमाळ यांनी घेतला असुन, सर्वसामान्यांच्या समस्या व गावाच्या समस्या काय असतात. ज्यामध्ये आपल्या गावातील रस्ते, पाणी, गटारे, रोडलाईट, शाळा, स्मशानभुमी, ग्राम सचिवालय, गणेश घाट, स्वच्छता मोहीम, तंटामुक्त गाव, हागणदारी मुक्ती साठी घरोघरी शौचालय मोहीम, राबवुन गावातील बारीक सारीक हालचाली व अनुचित प्रकार रोखण्यासाठी तालुक्यातील सर्वप्रथम नामाकंन मिळवलेली सी.सी.टी.व्ही. युक्त ग्राम पंचायतीला अनेक पुरस्कार मिळविणारे सरपंच म्हणून ख्याती असलेले मुरबाड पंचायत समितीचे सभापती श्रीकांत धुमाळ यांनी सभापती पदी विराजमान होताच, आता तालुक्यातील गावांचा आपला गावाप्रमाणे विकास साधण्यासाठी कंबर कसली असुन, त्यासाठी त्यांनी पाडाळे धरण कालवा प्रकल्प बाधितांना धनादेश वाटपासाठी आलेल्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे. श्रीकांत धुमाळ हे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांचे खंदे समर्थक असुन, कथोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रत्येक कामाचे नियोजन असते. तालुक्यातील विविध समस्या सोडविताना कुठल्याही प्रकारचा हलगर्जी पणा खपवुन घेतला जात नाही. व कुठल्या प्रकारचे मतभेद मानले जात नाहीत. गोरगरीबांना आपलाच वाटणारा आतापर्यतंचा एकमेव सभापती असल्याची नागरिकांत नेहमीच चर्चा असलेल्या सभापतींच्या या मागणीकडे विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे किती गांभीर्याने लक्ष देतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक वारी !!

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक वारी !! आषाढी एकादशी पंढरपूरच्या विठ्ठलाला साकड, मागणं, किंवा भेट घेण्यसाठी अनेक जन ...