विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते पाडाळे धरणग्रस्तांना नुकसानभरपाई धनादेशाचे वाटप !
"GST वरून ना. पटोले यांनी केंद्र सरकारचे काढले वाभाडे"
मुरबाड (मंगल डोंगरे) : मुरबाड तालुक्यातील पाडाळे धरणाच्या कालव्यात गेलेल्या जमिनीच्या मोबदल्यात नुकसान भरपाई पासून अनेक वर्षे शेतकरी हे वंचित राहिले होते. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत प्रयत्न करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिली. आणि आज त्यांच्याच हस्ते शेतकऱ्यांच्या गावात येवून त्यांना नुकसान भरपाईच्या धनादेशांंचे वाटप करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.यावेळी मोदी सरकारने जी.एस.टी. लावून सर्वसामान्य व गरीब जनतेचे कंबरडेच मोडल्याचा ना. पटोले यांनी केंद्र सरकारवर घणाघात करून चांगलेच वाभाडे काढले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातील आर्थिक धोरणानुसार जी एस टी म्हणजे श्रीमंतांंकडून कर वसुल करून त्या पैशाचा गोरगरीब, मजूर, कष्टकरी जनतेला रोजगार फायदा व्हावा हा मूळ उद्देश असतांंना केंद्र सरकारच्या या जी एस टी धोरणात यांच्या उलट झालं या देशातील भिकाऱ्यांंसह प्रत्येक माणूस टॅक्स भरू लागला. तर अंबानींना तासाला 90 कोटींचा फायदा वाढु लागला. तर मुंबईच्या लागुन असलेल्या ठाणे जिह्यात कुपोषणाच्या वाढत्या प्रमाणाने बालकं मरतात. आपल्या जमिनींंसाठी आपल्यालाच आंदोलन करावी लागतात.11वर्षे प्रश्न सुटत नाही ही खरी शोकांंतीका आहेअसे ना. पटोले यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले.
**कालव्याच्या बाधितांना उशिरा का होईना मदत मिळाली "पण मिल्हे हद्दीतील इनामदाराच्या कुळांच्या जमिनी गेल्या "त्यांची कोणीही दखल घेतली नाही ? ना कोणी कधी घेणार आहे.भुमिहिन होवून शासनदरबारी कुठलीही दखल नाही. त्यांना कोणी न्याय देईल का ? खोपिवली येथील एक पीडित शेतकरी "व कुळ 'मयत देऊ दामा डोंगरे' यांचे वारसदार नातु मंगल डोंगरे यांची खंत **
मुरबाड तालुक्यातील पाडाळे येथे लघु पाटबंधारे योजनेतून बंधारा बांधण्यात आला. यानंतर कालव्याचे काम सुरू झाले. परंतु जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांच्या जमिनींचे भुसंपादन न करताच कालव्याचे काम सुरु केले. यावेळी पत्रकार संतोष गायकर यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्त शेतकरी गुरूनाथ पष्टेंंसह इतर शेतकऱ्यांनी लढा देऊन मुंबई येथे उपोषण देखील केले. यानंतर कॉंग्रेसचे पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे कालव्याच्या नुकसान भरपाई संदर्भातील प्रश्न नेला. अनेक वर्षे या धरणबाधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागले असल्याने ना.पटोले यांनी चेतनसिंह पवार यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव लोकोशचंद्र व इतर अधिकारी, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी इ.अधिकाऱ्यांची एक बैठक विधानभवनात बोलावून नुकसानभरपाई संदर्भात निर्णय घेतला. त्या अनुषंगाने आज पाडाळे धरणाच्या कालव्यात गेलेल्या जमिनींच्या नुकसान भरपाईचे धनादेश शेतकऱ्यांच्या गावात जाऊन त्यांना देण्यासाठी आज स्वतः ना.नाना पटोले बांदलपाडा येथे येऊन धनादेशांंचे वाटप केले.दरम्यान ना.नाना पटोले यांनी चेतनसिंह पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली असता पवार यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही उशिरा मिळाली असल्याने त्यांना सन २००९ पासून भुईभाडे देण्यात यावे व कालव्याच्या रस्त्याचे शासनाने भुसंपादन करून मजबुतीकरण करावे अशी मागणीही केली .यावेळी खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे,उपाध्यक्ष सुभाष पवार, कॉंग्रेसचे प्रदेश सचिव राजेश घोलप, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनाजी बांगर,महिला आघाडी अध्यक्ष संध्या कदम,ठाणे शहर उपाध्यक्ष नितीन घोलप, नगरसेवक रवींद्र देसले, आरपीआय सेक्युलर जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदणे इ. मान्यवर व पाडाळे परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment