Sunday 21 February 2021

कार्यालयीन वेळा बदलाव्यात, महाराष्ट्रासह पाच राज्यांत रुग्णवाढ !!

कार्यालयीन वेळा बदलाव्यात, महाराष्ट्रासह पाच राज्यांत रुग्णवाढ !!


दिवसभरात १३,९९३ बाधित धोरण ठरविण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारकडे मागणी.......

मुंबई : नवी दिल्ली महाराष्ट्रासह पाच राज्यांतील करोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील उपनगरीय रेल्वे, रस्ते वाहतुकीवर पडणारा ताण लक्षात घेऊन केंद्र सरकारने कार्यालयीन कामाच्या वेळा बदलण्याची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणली. 

सकाळी १० ते संध्याकाळी ५ ही कार्यालयीन कामकाजाच्या वेळेची पारंपरिक मानसिकता बदण्याची आवश्यकता असून वेगवेगळ्या वेळांसाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय धोरण आखावे, अशी  मागणी मुख्यमंत्र्यांनी  निती आयोगाच्या बैठकीत केली. 

निती आयोगाची सहावी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे सहभागी झाले होते. मुंबईत केंद्र सरकारची कार्यालये, बँका यांच्या वेळा बदलाव्यात, अशी मागणी करोना निर्बंध शिथिल झाल्यापासून करण्यात येत आहे. सरकारी कार्यालयांमुळे सकाळी आणि सायंकाळी उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी होते.

ती टाळण्यासाठी केंद्राने आपल्या कार्यालयांच्या वेळा बदलण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केली.
पाच राज्यांमध्ये रुग्णसंख्येत वाढ महाराष्ट्रासह केरळ, पंजाब, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत दैनंदिन वाढ होत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. 

केवळ महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमधील एकूण रुग्णांपैकी सक्रिय रुग्णांचे प्रमाण ७५.८७ टक्के असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

No comments:

Post a Comment

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !!

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !! मुंबई (शांताराम गुडेकर) :       ...