Sunday 21 February 2021

मास्क न घालता दुसऱ्यांदा आढळल्यास एक हजार रुपये दंड........

मास्क न घालता दुसऱ्यांदा आढळल्यास एक हजार रुपये दंड........
 
पुणे : राज्यात करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भातील शहरांमध्येही करोनाबाधितांची संख्या दररोज मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आता अधिक कडक भूमिका घेतली जात आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी नवे आदेश काढले आहेत. 

त्यानुसार आता पुण्यात मास्क न घालता पहिल्यांदा आढळणाऱ्यास ५०० रुपचे दंड व तोच व्यक्ती पुन्हा जर मास्क न घालता आढळला तर त्याच्याकडून १ हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. 

कोविड -१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने पारीत केलेले आदेश, निर्देश, ए.ओ.पी. इत्यादींचे प्रभावी अंमलबजावणी बाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सही, शिक्क्यानिशी परिपत्रक काढण्यात आलं आहे. 
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमेवत झालेल्या व्हि.डि.ओ. कॉन्फरन्समध्य देण्यात आलेल्या सूचनांच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यात कार्यवाही करण्याबाबत आदेशित करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचाय समिती, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी, नगरपरिषद यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील सर्व मंगल कार्यालये, हॉल, लॉन्स, कोचिंग क्लासेस, खासगी शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा/ विद्यालय, महाविद्यालय, नाट्यगृह, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, मॉल्स, धार्मिक स्थळे, उद्याने व इतर गर्दी होणारी स्थळे या ठिकाणी वेळोवेळी अचानक भेट देऊन तपासणी करावी.

No comments:

Post a Comment

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !!

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !! कल्याण, प्रतिनिधी : जिजाऊ संघट...