कोकण विभागातील पहिलं घरकुल मार्ट मुरबाड तालुक्यात, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते डेमो हाऊचा शुभारंभ !
कल्याण, (संजय कांबळे) : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विविध घरकुल योजनेतर्गत पक्क्याघरांचे बांधकाम सुरू आहे. लाभार्थ्यांनी ही घरं बांधताना त्यांनी त्या ठिकाणची स्थानिक भौगोलिक परिस्थिती, पारंपरिक बांधकाम पद्धती अनुसरून घरं बांधावीत जेणेकरून यामुळे वेळ व पैसा वाचून अशी घरे दिर्घकाळ टिकतील.
या करीता मुरबाड पंचायत समिती आवारात 'डेमो हाऊस' बांधण्यात येणार आहे. तसेच घरकुलांसाठी लागणारी साधन सामग्री एकाच छताखाली मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत सरळगाव येथे महिला उद्योजक समूह स्थापन करून 'शाश्वत घरकूल मार्ट' उभारले आहे.
यांचा नुकताच शुभारंभ ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी 'डॉ भाऊसाहेब दांगडे' यांच्या हस्ते उपाध्यक्ष 'सुभाष पवार' यांच्या उपस्थितीत झाले. असे उपक्रम राबविणारी मुरबाड पंचायत समिती ही कोकण विभागातील पहिली पंचायत समिती असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मुरबाड पंचायत समिती सभापती श्रीकांत धुमाळ, उप सभापती खाकर ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, जिल्हा परिषद सदस्य सर्वश्री सुभाष घरत, उल्हास बांगर, रेखा कंठे प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) चंद्रकांत पवार, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा) एच.एल. भस्मे, कार्यकारी अभियंता (बांधकाम) नितीन पालवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे, महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले, मुरबाड गट विकास अधिकारी रमेश अवचार आदी अधिकारी तसेच जिल्हा आणि तालुका स्तरावरील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी अधिक माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भाऊसाहेब दांगडे म्हणाले, दोन उपक्रमामुळे नागरिकांना घरबांधतांना आणि साधन सामग्री जमवताना सुलभ होणार आहे. तसेच लाभार्थ्याना राहण्यासाठी सोयीस्कर व लाभार्थी स्नेही घरकुल बांधकामाला मार्गदर्शन ठरणार आहेत. घरकुल मार्टमुळे महिलांना आर्थिक दृष्ट्या समक्ष बनण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. 269 चौ.फूट घरकुल बांधकाम भूकंप प्रतिरोधक, आणि पर्यावरण पूरक असणार आहेत. प्रत्येक तालुक्यात दोन्ही उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही दांगडे यांनी सांगितले.
महा आवास अभियाना अंतर्गत सर्वांसाठी घरे 2022 या शासनाच्या धोरणा अंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य परस्क्रुत आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामात गतिमान करणे व त्यामध्ये गुणवत्ता आणणे यासाठी राज्यात 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या 100 दिवसाच्या कालावधीत महा आवास अभियान राबविण्यात येत आहे. १०० टक्के उदिष्ट साध्य करण्यासाठी यंत्रणानी जलद काम करण्याचे निर्देशही श्री.दांगडे यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रेखा कंटे यांनी घरकुल मार्ट मधून १० हजार च्या सिमेंट गोण्या खरेदी करून महिलांना प्रोत्साहन दिले.
No comments:
Post a Comment