शिवस्मारक समिती संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा !
** अवघे वातावरण झाले शिवमय
घाटकोपर, (केतन भोज) : माजी नगरसेवक शिवभक्त संजय दादा भालेराव यांनी गनिमी कावा करत घाटकोपर पश्चिम अमृत नगर सर्कल याठिकाणी २७ मार्च २०१६ रोजी शिवजयंती दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वरूढ मूर्तीची स्थापना केली. तसेच शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या संकल्पनेतून तसेच निधीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या ठिकाणी सुशोभीकरण करून शिवस्मारक बांधण्यात आले. तेव्हा पासून याठिकाणाला एक वेगळी ओळख व वेगळे महत्त्व मिळाले असून याठिकाणाला छत्रपती शिवाजी महाराज चौक, अमृत नगर असे नाव देण्यात आले. याचे सर्व श्रेय शिवभक्त संजय दादा भालेराव यांचे असून तेव्हा पासून दरवर्षी शिवस्मारक समितीचे संस्थापक/अध्यक्ष तथा माजी नगरसेवक शिवभक्त संजय दादा भालेराव हे याठिकाणी तिथी दिवशी मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करतात. घाटकोपर मधीलच नाही तर मुंबई मधील सर्वात मोठा शिवजन्मोत्सव सोहळा हा फक्त घाटकोपर मध्ये शिवभक्त संजय दादा भालेराव हे साजरा करतात. तेव्हापासून हे शिवस्मारक घाटकोपर मधील हजारो तरुणांचे शक्तिस्थान बनले आहे.
यावेळी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या आदल्या रात्री म्हणजे रविवार दि.१६ मार्च रोजी मध्यरात्री ठिक बारा वाजता शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे व शिवसेना युवासेना सचिव आमदार वरुण सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ईशान्य मुंबई लोकसभेचे खासदार संजय दिना पाटील, युवासेना कार्यकारिणी सदस्य राजोल संजय पाटील, माजी नगरसेविका डॉ.अर्चना संजय भालेराव यांच्या हस्ते हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची शिव महाआरती करण्यात आली. यावेळी 'जय भवानी, जय शिवराय' असा जयघोषात अवघे वातावरण शिवमय झाले होते. तसेच फाल्गुन तृतीया दि.१७ मार्च रोजी तिथी प्रमाणे शिवजन्मोत्सव सोहळा २०२५ साजरा करण्यात आला असून सकाळी ठिक ८.वा.शिव अभिषेक, शिव वंदना, आरती व पुजा करण्यात आली, त्यानंतर सायंकाळी पुन्हा ६.वा.हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत शिव महाआरती करण्यात आली.
यावेळी शिव स्मारकाला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. तसेच शिवस्मारकाला केलेल्या आकर्षक रोषणाई तसेच लेझर शो मुळे शिवस्मारकाचे तेज डोळ्याचे पारणे फेडत होते. शिवजन्मोत्सव दिवशी दिवसभर याठिकाणी साहसी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि ढोल - ताशा पथकांचे स्फूर्तिदायक वादन, पारंपारिक वेशभूषेत नटलेले आबालवृद्ध ... 'जय भवानी, जय शिवाजी' असा जयघोष.. अग्रभागी असणारी शिवज्योत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वरूढ पुतळा अशा स्फूर्तिदायी आणि शिवमय वातावरणात शिवस्मारक समितीचे संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली तसेच सर्व हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवछत्रपतींना मानवंदना देण्यात आली. यावेळी घाटकोपर मधूनच नाही तर मुंबईच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त या शिवजन्मोत्सव सुवर्ण सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. त्यामुळे हा शिवजन्मोत्सव सोहळा घाटकोपर मधीलच नाही तर मुंबई मधील सर्वात मोठा शिवजन्मोत्सव नावाजला जातो.
यावेळी शिवस्मारक समिती- शिव आरती संघ, घाटकोपरच्या सर्व शिवभक्तांनी या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी कठोर परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment