म्हारळ ग्रामपंचायत हद्दीत महाविकास आघाडीच्या विकास कामांचे धुमधडाक्यात भूमिपूजन, करोडोंचा निधी मंजूर !!
कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता येताच ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रंमाक १ ते ६ मधील प्रभागात विविध विकास कामांचे धुमधडाक्यात भूमिपूजन कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते नुकतेच झाले.
म्हारळ ग्रामपंचायतीवर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आणि अपक्ष अशा महाविकास आघाडीने सत्ता खेचून आणली. येथे भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी अशी लढत झाली होती. शिवसेनेच्या प्रगती प्रकाश कोंगिरे यांची सरपंच तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी निलेश देशमुख यांची उपसरपंच पदी निवड झाली. निवड होताच पहिल्या मासिक मिटिंगमध्ये विकास कामे करण्याचा निर्धार सर्वच म्हणजे १७ सदस्यांनी घेतला होता. त्यानुसार प्राधान्यक्रमाने जेथे अधिक गरज आहे अशी कामे अगोदर घेण्यात आली. प्रभाग क्रमांक १ ते ६ मध्ये ही विकास कामे निश्चित करण्यात आली. यामध्ये गावदेवी मंदिर परिसरात काँक्रिट रस्ता व गटार बांधणे, सिमेंट काँक्रिट गटार, गटार व रोड, व सिमेंट काँक्रिट रोड ही चार कामे नागरी सुविधा योजनेतून करण्यात येणार आहेत. तर रस्ता काँक्रिट करण, रस्ता काँक्रिट करण, सुरेश खांडेकर ते रोहिणी केणे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिट करण अशी कामे असून ही कामे साधारणपणे १ करोड १० लाखांच्या आसपास आहेत.
प्रथम एमआयडीसी रोड शेजारच्या रस्त्याचे भूमिपूजन कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते नारळ फोडून झाले. नंतर गावदेवी मंदिर, म्हारळ पाडा, केणे यांच्या घरासमोरील रस्ता, मंदिरा मागील ४ प्रभागातील रस्त्याचे भूमिपूजन जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, सरपंच श्रीमती प्रगती प्रकाश कोंगिरे, उपसरपंच अश्विनी निलेश देशमुख, वेदिका विवेक गंभीरराव, निलिमा नदू म्हात्रे, बेबी दतू सांगळे, मंगला इंगळे मोनिका गायकवाड, अनिता देशमुख, नंदा म्हात्रे अंड दिपक आहिरे म्हारळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नितीन देशमुख आदीच्या हस्ते झाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश देशमुख, जेष्ठ शिवसेनिक विलास देशमुख (काका) डॉ सोमनाथ पाटील, मनसेचे विवेक गंभीरराव, सदस्य किशोर वाडेकर कल्याण पंचायत समितीच्या माझी सभापती रंजना केतन देशमुख, सदस्या अस्मिता जाधव, जिप सदस्या श्रीमती वैशाली शेवाळे, सदस्य पांडुरंग म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद देशमुख, योगेश देशमुख, प्रकाश चौधरी, महेश देशमुख लक्ष्मण कोंगिरे, ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.



No comments:
Post a Comment