मुरबाड मध्ये पोलीस प्रशासनाविरूध्द आंबेडकरी जनतेचा हल्ला बोल मोर्चा !!
मुरबाड मंगल डोंगरे} - मुरबाड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या फणसोली गावातील एका युवकाने फेसबुकवर भारतीय संविधानाच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहून प्रसारित केली. याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. परंतु पोलिसांनी त्या युवकावर किरकोळ गुन्हा दाखल करून त्याला पाठीशी घातल्याचा आरोप करून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी आज मुरबाड शहरातील शिवाजी चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत प्रचंड संख्येने मोर्चा काढला.
तालुक्यातील फणसोली गावच्या तरूणाने फेसबुकवर भारतीय संविधान विरोधी पोस्ट टाकून दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या आशयाची ही पोस्ट असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी करून सदर तरूणावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती. परंतु पोलिसांनी त्या तरूणावर किरकोळ स्वरूपाचा गुन्हा नोंद केला. यामुळे राज्यघटनेचा अपमान करून तरूणाने देशद्रोह केला आहे. अशा आशयाचे लेखी पत्र देऊन आज प्रचंड संख्येने मोर्चात नागरिक सामील झाले होते. यावेळी पोलिसांनी तरूणाची बाजू घेतल्याचा आरोप आरपीआय सेक्युलर चे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने यांनी करून सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या या पोस्टला ज्यांनी लाईक केले आहे. त्यांनाही सहआरोपी करा अशी मागणी केली आहे.


No comments:
Post a Comment