मुरबाड मध्ये विविध उपक्रमांनी खासदार कपिल पाटील यांचा वाढदिवस साजरा !!
**पत्रकारांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने केला सन्मान **
मुरबाड (मंगल डोंगरे ) भिवंडी लोकसभा क्षेत्राचे खासदार कपिल पाटील यांचा वाढदिवस मुरबाड तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी भाजपाच्या वतीने तालुक्यातील आरोग्य यंत्रणेत सेवा करणा-या कर्मचारी अधिका-यांसह पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना कोरोना योद्धा पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव सर,सरचिटणीस दिलीप देशमुख, जयवंत कराळे सर,युवामोर्चाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मुकेशजी विशे,सुरेशजी बांगर सर,इत्यादींसह आरोग्य अधिक्षक डॉ.वाठोरे , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बनसोडे, डॉ. इंगळे,डॉ. खंबायत,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मुरबाडच्या विकासाचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखले जाते.ते भिवंडी लोकसभेचे कार्यसम्राट खासदार कपिल पाटील आणि विकासाचे वारे- किसन कथोरे हि नावे सर्वश्रुत ठरतात. मुरबाड तालुक्यात लाखो-करोडोंचा निधी आणून तालुक्यातील नागरिकांना पायाभूत सुविधा देवुन ,मुरबाड शहराचा कायापालट या दोन अनुभुत व्यक्तींमुळेच झाला आहे. हे मुरबाडकरांचे सौभाग्य मानले जात आहे. कोरोना संकटात ज्यांनी कुठल्याही प्रकारचे पक्षीय किवा जातीय राजकारण न करता, आपल्या जिवाची पर्वा न करता सर्वसामान्य जनतेपासून आरोग्य यंत्रणेसह पत्रकार मंडळीं या सर्वांची काळजी घेतली. त्या विभुतीचा अर्थात कार्यसम्राट खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मुरबाड भाजपच्या वतीने अनाथ आश्रमातील मुलांना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप,तसेच कोरोना संकटात ज्या आरोग्य यंत्रणेने स्वताची पर्वा न करता जनतेला सेवा दिली. ते आरोग्य कर्मचारी, अधिकारी, यांच्या सह समाजातील विविध घटना, घडामोडींचा मागोवा घेवुन प्रशासनाला जाग्रुत करण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांना कोरोना योद्धा पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी जेष्ठ पत्रकार मंगलजी डोंगरे, जनशक्ती चे जिवनजी शिंदे,पुण्यनगरीचे संतोषजी गायकर, शंकरजी करडे,लक्ष्मण पवार, सुभाष जाधव,अरुण ठाकरे,दत्ता माळवे,


No comments:
Post a Comment