Sunday, 7 March 2021

शिवसेना शाखा क्रमांक १७, शिवबा मित्र मंडळ व श्री जनहित प्रतिष्ठानतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन !!

शिवसेना शाखा क्रमांक १७, शिवबा मित्र मंडळ व श्री जनहित प्रतिष्ठानतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन !!


मुंबई(शांत्ताराम गुडेकर) :

       शिवसेना शाखा क्रमांक १७, शिवबा मित्र मंडळ व श्री जनहित प्रतिष्ठान आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक ८ मार्च २०२१ रोजी करण्यात आले आहे. या विविध कार्यक्रमात ६५ ज्येष्ठ महिलांचा सत्कार, विभागातील महिला डॉक्टर, समाजसेविका, आरोग्य सेविका, महिला पोलीस यांना सन्मानपत्र देऊन कोविड योद्धा म्हणून गौरवण्यात येणार आहे. जनहित प्रतिष्ठानचे कार्यकर्ते श्रीमती लता मकवाना यांना त्यांची मिसेस इंडिया २०२१ उपविजेत्या झाल्याबद्दल सत्कार करण्यात येणार आहे.हा कार्यक्रम समर्थ हॉल गावदेवी मैदानात समोर शिंपोली गाव बोरीवली(प.) येथे सायंकाळी सात ते नऊ यावेळेत होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींसह शिवसेना शाखा क्रमांक १७ , युवा सेना, शिवबा मित्र मंडळ व जनहित प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभणार आहे.तरी या महिला दिनानिमित आयोजित केलेल्या कार्यक्रमाला स्थानिकांनी हजर रहावे असे आवाहन सुनील पाटील शाखाप्रमुख, अध्यक्ष यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव !

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव ! मुंबई (शांताराम गुडेकर)          ...