आगीत खाक झालेल्या घरमालकाला दिला जि.प.सदस्य सचिन बल्लाळ यांनी जीवनावश्यक वस्तूंचा मदतीचा हात !!
'नविन घरकुल संदर्भात घेतला तात्काळ निर्णय'
मुंबई, (समीर खाडिलकर/ शांत्ताराम गुडेकर) :
जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ व माजी सभापती बबनराव देसाई यांनी अलबादेवी येथे मनोहर शिवनगेकर यांची भेट घेतली. गँस गळती होऊन संपुर्ण घर आगीत खाक झाले होते. त्यामुळे नविन घरकुल संदर्भात तात्काळ निर्णय घेऊन श्री. सचिन बल्लाळ यांनी तात्काळ आवश्यक अशा जीवनावश्यक वस्तूसाठी त्यांना मदत केली. सचिन बल्लाळ यांनी घेतलेला निर्णय व दिलेला मदतीचा हात यामुळे त्यांचे स्थानिकांकडून व घरमालकाकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

No comments:
Post a Comment