Monday, 8 March 2021

निर्सगाच्या सानिध्यात महिलांनी साजरा केला महिला दिन !! 'विरार चा महिलांचा आगळावेगळा उपक्रम'

निर्सगाच्या सानिध्यात  महिलांनी साजरा केला महिला दिन !! 'विरार चा महिलांचा आगळावेगळा उपक्रम'

*द्विती फिटनेसच्या अनुश्री भाटकर यांचा स्तुत्य उपक्रमासाठी पुढाकार*


ठाणे : द्विती फिटनेस आणि नोमाड व्हेंचर्स इंडिया यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी (दि.७) माहुली गडावर रॅपलिंग आणि निसर्गाच्या सानिध्यात मेडिटेशनचे आयोजन करण्यात आले होते. द्विती फिटनेसच्या संचालक अनुश्री भाटकर यांनी खास महिलांसाठी या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केलेहोते. 


मुख्य म्हणजे यात २२ ते ५० वयेगटापर्यंतच्या महिलांचा सहभाग होता. विशेषतः यात भाग घेतलेल्या सर्व महिला या गृहिणी होत्या. त्यामुळे रोजच्या रहाटगाड्यातून स्वत: साठी सुखाचे दोन क्षण काढता आल्याचा सुंदर अनुभव सगळ्या महीलानी घेतला. 


८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी काय वेगळे करता येईल याचा विचार अनुश्री करत होत्या. त्यावेळी संसारात अडकलेल्या, स्वत:साठी कधीही वेळ न देऊ शकणाऱ्या महिलांसाठी त्यांनी हा उपक्रम राबवण्याचे ठरवले. यानुसार शहापूर जवळील माहुली गडावर ट्रेकिंग, सोबतच रॅपलिंग या साहसी प्रकाराचे नियोजन केले. जवळपास सर्वच वयोगटातल्या २२ महिलांनी यात सहभाग नोंदवला. ट्रेकिंग नंतर रॅपलिंग हा काहीसा अवघड मानला जाणारा प्रकार करतांना अनेकींना सुरुवातीला भिती वाटली मात्र नंतर त्यांनी यावर मात करत यशस्वीपणे हा प्रकार केला. यानंतर गडावर निर्सगाच्या सानिध्यात मेडिटेशन करण्यात आले. यावेळी रॅपलिंगचे प्रशिक्षण विवेक पाटील यांनी दिले. तर उपक्रमाच्या यशस्वितेसाठी गणेश गजरे यांचे सहकार्य लाभले. आयुष्यात पहिल्यांदाच आपण असे काही वेगळे केले आणि त्यातून मनमुराद आनंद मिळवला अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया भाग घेतलेल्या महिलांनी अनुश्री भाटकर यांना दिल्या.

अविनाश ओंबासे
9820991450

No comments:

Post a Comment

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव !

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव ! मुंबई (शांताराम गुडेकर)          ...