Monday, 1 March 2021

के मंजुलक्षी जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असतात तर त्यांनी अरुणा प्रकल्पाच्या बेकायदेशीर कामांना परवानगी दिलीच नसती. !!

के मंजुलक्षी जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असतात तर त्यांनी अरुणा प्रकल्पाच्या बेकायदेशीर कामांना परवानगी दिलीच नसती. !!

"दलालांच्या भूलथापांना बळी न पडता आपले प्रश्न सोडविण्यासाठी अरुणा प्रकल्पग्रस्तांनी आपली एकजूट कायम ठेवावी" - तानाजी कांबळे यांचे आवाहण 

*अनेक प्रकल्पग्रस्तांच्या उपस्थितीत भुमीपुजन सोहळा दिमाखात* 


भुईबावडा : अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनांमुळे पुनर्वसन गावठणातील विकास कामांना चालणा मिळाली आहे. तरीही अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के मंजु लक्ष्मी या 2019 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असतात तर त्यांनी ठेकेदाराचे लाड पुरवत आपल्या खात्याच्या कोणत्याच अधिका-यांच्या बेकायदेशीर बाबींना कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिलीच नसती. आणि प्रकल्प ग्रस्तांची 130 घरे धरणाच्या पाण्यात बुडण्याची नामुष्की प्रकल्प ग्रस्तांची ओढवली नसती असे प्रतिपादन लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांनी केले आहे.

मांगवली पुनर्वसन गावठाणात दिलेल्या भुखंडातील निवासस्थानाचा भुमीपुजन सोहळा रविवार दिनांक 28 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजता प्रकल्प ग्रस्तांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत पार पडला त्या प्रसंगी लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे बोलत होते. या वेळी माजी उपसरपंच प्रभाकर सावंत. वारकरी संप्रदायातील  ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.बाळकृष्णबुवा जाधव, अपणा बँक कणकवली शाखेचे व्यवस्थापक अशोक बांद्रे, मधुकर कदम,शिवराम जाधव ,रमेशमामा दळवी,शिवाजी जिनगरे वसंतदाजी नागप,भोम बौध्द विकास मंडळाचे अध्यक्ष संतोष कांबळे, रिपब्लिकन नेते वासुदेव जुवाटकर, बौध्दाचार्य रविंद्र जंगम, कवि सुनिल ओटवकर, प्रकाश सावंत, विलास कदम, अनंत नागप, पांडुरंग जाधव, अशोक सावंत, शशिकांत सावंत, सुरेश कदम, अनिल सुर्यवंशी, राजा कांबळे, प्रमिला सावंत, तारामती सावंत, रोहीणी दळवी, सुमित्रा कदम, आरती कांबळे, सानिका कांबळे, साक्षी सावंत, अंकीता सावंत, संचिता सावंत, जयश्री कदम आदी मान्यवर उपस्थित होते. 

अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, तत्कालीन कार्यकारी अभियंता राजन डवरी आणि बुवा सह गावातील तिन दलालांनी सामुहिक पणे अरुणा प्रकल्पातील सुमारे 52 प्रकल्प ग्रस्तांना त्यांच्या सोईनुसार निवासी भूखंड बदलुन दिले. परंतु स्वताः मी व संतोष चव्हाण प्रकल्पग्रस्त आहोत.
'हदय विकार, डायबेटीस' सारख्या आजाराने त्रस्त असतांना आणि धरण प्रकल्पात आमची घरे बुडालेली असतांना पावणे दोन वर्ष आम्हाला निवासी भूखंडापासुन वंचित ठेवले गेले. सिंधुदुगँ च्या विद्यमान जिल्हाधिकारी के मंजुलक्षी या लोकाभिमुख अधिकारी आहेत. त्या संवेदनशील अधिकारी आहेत. त्यांच्या दूरदृष्टीने आणि न्याय निर्णया मुळे आम्हाला मांगवली पुनर्वसन गावठाणात निवासी भूखंड बदलुन दिले गेले आहेत. त्या बद्दल तानाजी कांबळे, व संतोष चव्हाण यांनी 'जिल्हाधिकारी के मंजु लक्ष्मी' यांचे आभार मानले आहेत. 

तत्कालीन परीस्थीतीत 2019 ला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणुन के मंजु लक्ष्मी कार्यरत असतात तर बेकायदेशीर घळभरणीला त्यांनी परवानगी दिली नसती.आणि अरुणा प्रकल्प ग्रस्तांची सुमारे 130 रहाती घरे ही धरणाच्या पाण्यात बुडाली नसती.असा विश्वास ही लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांनी या वेळी व्यक्त केला.

मांगवली, कुंभारवाडी, कुसुर, किंजळीचा माळ वेंगसरकर पुनर्वसन गावठाणातील सोयी सुविधा आणि अरुणा प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न जिल्हाचे पालक मंत्री, ना. उदयजी सामंत, जलसंपदा राज्यमंत्री ना. बच्चुभाऊ कडु आणि जिल्हाधिकारी के मंजु लक्ष्मी यांच्या माध्यमातूनच सुटतील. गावातील ज्या दलालांनी अरुणा प्रकल्पग्रस्तांची फसवणुक केली आहे.त्यांच्या भूलथापांना बळी न पडता आपल्या न्याय हक्कांसाठी अरुणा प्रकल्पग्रस्तांनी आपली एकजूट कायम ठेवावी असे आवाहन ही लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांनी या वेळी केले आहे. 

वासुदेव जुवाटकर, मधुकर कदम यांची यावेळी भाषणे झाली. मांगवलीत पुनर्वसन गावठाणातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...