संतुबाई, रानुबाई फिल्म प्रोडक्शन च्या आगामी नवीन चित्रपटाचे आॅडिशन कराड येथे संपन !
कल्याण (संजय कांबळे) : आगामी भव्य मराठी चित्रपट घेऊन येणाऱ्या संतुबाई, रानुबाई फिल्म प्रोडक्शन चे कलाकार आॅडिशन कराड येथील अयोध्या हाॅटेल येथे संपन्न झाले. यावेळी यांना शुभेच्छा देण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सातारा चे शाखाप्रमुख महेश देशपांडे हे आवर्जून उपस्थित होते.
संतुबाई, रानुबाई फिल्म प्रोडक्शन ही चित्रपट संस्था आगामी भव्य असा मराठी चित्रपट घेऊन येत आहे. या करिता सध्या ते महाराष्ट्रातील विविध जिल्हात कलाकारांची आॅडिशन सुरू आहेत. कराड येथील हॉटेल अयोध्या येथे नुकतेच आॅडिशन संपन्न झाले. यावेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सातारा चे शाखाप्रमुख महेंद्र देशपांडे हे आवर्जून उपस्थित राहून मान्यवरांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक सर्जेराव गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. या आॅडिशनला भेट देण्यासाठी सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक वासू पाटील, हेमंत पाटील, विलास वर्पे, मलकापूर नगर पंचायतीचे विद्यमान नगरसेवक व बांधकाम सभापती राजेंद्र प्रल्हाद यादव (आबा), चांदोबा डोंगर आभाळी गेला, या चित्रपटाचे निर्माते दिपक जाधव, आॅल इंडिया सिने आर्टिस्ट असोसिएशन चे व्हाईस प्रेसिडेंट दिलावर खान, सीमा धडस, दीपक तुपे, संपत मोटे, समाधान पाटील, सचिन साठे, तसेच एक गाव तेरा भानगडी या वेबसिरीजमधील गुणी अभिनेत्री प्रतीक्षा पाटील व इतर सिनेक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment