वरप येथील कोरोना कोविड सेंटर मध्ये एकाच दिवशी बारा पेंशट अॅडमिट?
कल्याण, (संजय कांबळे) : कालच सुरू झालेल्या वरप येथील कोरोना कोविड सेंटर मध्ये केवळ एकाच दिवशी तब्बल १२ कोरोना पेशंट अॅडमिट झाले असून यातून कल्याण ग्रामीण भागात देखील कोरोना किती झपाटय़ाने वाढत आहे हे लक्षात येते.
कल्याण तालुक्यातील म्हारळ वरप कांबा, पावशेपाडा, रायते, मानवली, गोवेली, मामणोली, आणे भिसोळ, नांलिबी आदी ५० ते ६० गावासाठी अत्यावश्यक असणारे वरप येथील कोरोना कोविड सेंटर अखेर वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर शनिवारी म्हणजे काल सुरु झाले. सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली होती. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचे पेंशट वाढत आहेत. अगदी कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात खोणी, म्हारळ, वरप घोटसई, खडवली, वेळे, दानबाव, चिंचवली, राया, वाकलण अशा ग्रामपंचायत हद्दीत कोरोना पेंशट मिळू लागले आहेत. तालुक्यात आतापर्यंत १४४ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तर १२९० अॅक्टिव रुग्ण आहेत. तसेच हायरिस्क चे पेंशट २१हजार २८६ इतके पेंशट असून दिवसेंदिवस ते वाढत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून वरप येथील कोरोना कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी या कोविड सेंटर मध्ये तब्बल १२ पेशट दाखल झाले असून यामध्ये दोन पेशंट आॅक्शिजन वर आहेत असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भारत मासाळ यांनी सांगितले.. तसेच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment