विकेड लाॅकडाऊण नंतर बिर्लागेट येथे नागरिकांची तूफान गर्दी, दुकानदारांनकडून कोरोना नियमांची पायमल्ली !!
कल्याण, (संजय कांबळे) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अतर्गत राज्यात शुक्रवार सांयकाळ ते सोमवार सकाळी ७ पर्यंत वीकेंड लाॅकडाऊण लागू केले होते राज्यातील इतर जिल्हा याप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, शहापूर अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर मधून या लाॅकडाऊण ला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला परंतु यानंतर बिर्लागेट येथील मार्केट मध्ये नागरिकांनी खरेदीसाठी तूफान गर्दी केली होती. यावेळी लोकांसह दुकानदारांकडून कोरोना नियमांची पायमल्ली केल्याचे दिसून येत होते.
राज्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेने हाहाकार उडवला आहे. आॅक्शिजन, व्हॅन्टीलेटर चा तूटवडा, बेड मिळेना, हाॅस्पिटल फुल्ल यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ब्रेक द चेन जाहिर करुन राज्यात वीकेंड लाॅकडाऊण लागू केले होते. शुक्रवारी सायंकाळी ते सोमवारी सकाळी ७ असे हे लाॅकडाऊण लागू केले होते. याला संपूर्ण महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला. ठाणे जिल्ह्यातील, कल्याण, डोंबिवली, ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर सह ग्रामीण भागात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. ब्रेक द चेन अंतर्गत शासनाने कोरोना चे अनेक नियम लागू केले आहेत. यामध्ये नागरिकांनी तसेत अत्यावश्यक सेवेतील लोकांनी मास्क लावने, सोशलडिंस्टिंग चे पालन, सॅनिटायझर ठेवने गर्दी न करने, गर्दी झाल्यास दुकान मालकावर गुन्हा दाखल करणे आदीचा समावेश आहे. पण या वीकेंड लाॅकडाऊण नंतर बिर्लागेट येथे नागरिकांची तूफान गर्दी झाली होती. तसेच १४ एप्रिल नंतर राज्यात लाॅकडाऊण लागू होईल अशा बातम्या येवू लागल्याने म्हारळ वरप कांबा, रायते, मानवली, आपटी मांजर्ली, मामणोली, गोवेली, अनखर म्हसकळ, आदी गावांसाठी महत्त्वाची असलेली बिर्लागेट बाजारपेठ आज साहित्य खरेदीसाठी गर्दीने फुलून गेली होती. भाजीपाला पासून ते किराणा माल, मसाला साठी मिरची खरेदीची झुंबड उडाली होती. येथे प्रत्येक दुकानांसमोर मोठी गर्दी होती, ना मास्क, ना सॅनिटायझर ना सोशलडिंस्टिंग, कशाचेच पालन होताना दिसत नव्हते, येथे उघड उघड कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसत होते. त्यामुळे अशीच परिस्थिती राहिली तर कोरोनाची तिसरी लाट यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे बिर्लागेट येथील दुकानदारांवर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

No comments:
Post a Comment