Saturday, 3 April 2021

श्री पाणबुडी देवी कलामंच सह शाहिर दिपक भुवड तर्फे अनोखा शैक्षणिक उपक्रम !! 'चिपळूण तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा पोसरे नं.२ शाळेला दिले कपाट भेट'

श्री पाणबुडी देवी कलामंच सह शाहिर दिपक भुवड तर्फे अनोखा शैक्षणिक उपक्रम !!

'चिपळूण तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा पोसरे नं.२ शाळेला दिले कपाट भेट'


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर/दिपक कारकर) :

                देशाचं उद्याचं भवितव्य म्हणजे विद्यार्थी होय. प्रत्येकालाच आठवणीत राहणारी, जेथ आपली खऱ्या अर्थाने शैक्षणिक जडणघडण झाली अर्थातच "ही आवडते मज मनापासूनी शाळा, लावीते लळा ही जसा माऊली बाळा" अशी ती प्राथमिक शाळा अनेकांनाच न विसर पडणारी आहे. 


या शाळेतून शालेय शिक्षणाचे धडे गिरवत आज विविध क्षेत्रात चमकणारी अनेक मंडळी ही कोकणच्या लाल मातीतील आणि खेडेगावातून शिक्षण घेऊन मोठी झालेली असते. चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोसरे नं.२ या शाळेचे माजी विद्यार्थी व पोसरे गावचे सुपूत्र असणारे शाहिर दिपक भुवड यांच्या संकल्पनेतून व श्री पाणबुडी देवी कलामंचाच्या विशेष सहकार्याने नुकताच या शाळेच्या गुणवत्ता विकासाला चालना मिळावी म्हणून शैक्षणिक उपक्रम हाती घेऊन कोव्हिड - १९ च्या पार्श्वभूमीवर देखील शाळेला भेट वस्तू


म्हणून "कपाट" देत हा उपक्रम गुरुवार दि.०१ एप्रिल २०२१ रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुप्रिया सावर्डेकर मॅडम, सह शिक्षिका वर्षा देसाई मॅडम, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष अविनाश आदवडे, शालेय शिक्षक मंगेश पाडेकर सर, सदस्य - निलेश आंबेडे, श्रध्दा चांदीवडे, नंदा आदवडे, श्री पाणबुडी कलामंचाचे सदस्य शाहिर दिपक भुवड, तसेच सौ. चित्रा दिपक भुवड, पोसरे ग्रामस्थ मंडळ व विद्यार्थी पालक वर्ग यांच्या उपस्थितीत ही भेटवस्तू सुपूर्त करण्यात आली. मुंबई रंगभूमीवर अल्पवधीत कोकणातील नमन/जाखडी नृत्य/नाटक या लोककलेचं आयोजन करणारे, शिवाय विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या श्री संतोष घाणेकर यांचे श्री पाणबुडी देवी कलामंच व कोकण सुपूत्र शाहिर दिपक भुवड यांच्या प्रयत्नांतुन राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...