Thursday, 8 April 2021

कोरोनाच्या महासंकटासमोर आरोग्य विभागातील रिक्त पदाचे आव्हान? कर्मचारी पाॅझिटिव्ह येवू लागल्याने 'दुष्काळात तेरावा'?

कोरोनाच्या महासंकटासमोर आरोग्य विभागातील रिक्त पदाचे आव्हान? कर्मचारी पाॅझिटिव्ह येवू लागल्याने 'दुष्काळात तेरावा'? 


कल्याण, (संजय कांबळे) : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोनाचे महासंकट ओढवले असताना नागरिकांवर उपचार करणाऱ्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्याप्रमाणात रिकाम्या जागा असून त्या भरल्या नसल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कमालीचा ताण येत असून अशातच हे कर्मचारीच कोरोनाचे शिकार होऊ लागल्याने भविष्यात परिस्थिती किती गंभीर होऊ शकते याचा विचार करण्याची गरज आहे.


मागील वर्षी आपल्या राज्यात कोरोनाने शिरकाव केला खरा, परंतु आपल्या सर्वच आरोग्य, अंगणवाडी सेविका व मदतनीस, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनतेने कडक लाॅकडाऊणचे पालन केल्याने कोरोनासारखे भंयकर संकट आपण रोखू शकलो यावर नियंत्रण मिळवू शकलो, परंतु यानंतर कोरोनाचे संकट गेले या आविर्भावात बेसावधपणे वागलो आणि दुर्दैवाने आता दुसरी लाट आली. ही इतकी भंयकर की रूग्ण संख्या वाढीचा दर कित्येक पटीने वाढला. आज महाराष्ट्र जगात चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. यावरून हे किती भंयकर आहे याचा अंदाज येतो. आज कित्येक जिल्ह्य़ात बेड, आॅक्शिजन, व्हॅन्टेलिटर, आणि व्हाॅक्शीन संपलेले आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पनवेल येथील परिस्थिती भयानक बनत चालली आहे. आपल्या ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर अनेक तालुक्यातील गावामध्ये कोरोना पोहचला आहे. कल्याण तालुक्यातील खोणी, वडवली, खडवली, म्हारळ, वरप, घोटसई, म्हसकळ, अनखर, जांभूळ, बापसई, अंताडे, कोसले, नांदप, राया, मानवली, कुंदे, आदी गावांमध्ये कोरोना पोहचला आहे.
सध्याच्या परिस्थितीत ग्रामीण भागातील पेशंट चा विचार केला तर केवळ ठाणे सिव्हिल हाॅस्पिटल हा एकमेव पर्याय आपल्या पुढे आहे. 
कल्याण साठी महत्त्वाचे ठरणारे वरप येथील कोविड केअर सेंटर कधी सुरू होईल हे सांगता येत नाही. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे जरी प्रयत्न करत असले तरी येथे काम करायला कोणी तयार होईना हे खरे वास्तव आहे. भिवंडी तालुक्यातील सावाज येथील कोरोना कोविड हाॅस्पिटल चे उद्घघाटन झाले मात्र अद्यापही ते सुरू नाही. कोरोना चे पेंशट तर दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच संपूर्ण जिल्ह्य़ात आरोग्य विभागात मोठय़ा प्रमाणात रिक्त पदे आहेत. एकटय़ा कल्याण तालुक्याचा विचार केला तर सुमारे ४५ टक्के पदे रिक्त आहेत. तालुक्याला ३० सिस्टरची गरज असताना केवळ १२ सिस्टर काम करत आहेत. १८ रिक्त आहेत. अशीच स्थिती गोवेली ग्रामीण रुग्णालयाची आहे. अगोदरच पदे रिक्त आहेत अशातच ३ सिस्टर व एक डाॅक्टर कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. तर कोणाचे वडील, पती, सासू सासरे, भाऊ, बहीण, मुले पेशंट आहेत. त्यामुळे रुग्णालयात काम कोण व कसे करणार हा मोठा प्रश्न पडला आहे. 
अशातच आता शासनाने कोविड लसीकरण केंद्र सुरु केली आहेत. येथील वाढणारी गर्दी, अपुरी जागा यामुळे पुन्हा कोरोनाची वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोवेली ग्रामीण रुग्णालय व दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे असा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे त्यामुळे सध्याच्या काळात कोरोनाचा वाढणारा पार्दूभाव पाहता जिव वाचवणारे अर्थात आरोग्य अधिकारी व कर्मचारी हे जर सुरक्षित राहिले नाही तर इतर सर्वसामान्य जनतेचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शासनाने प्राधान्याने प्रत्येक गाव, तालुका, जिल्हा येथील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची रिक्त पदे भरावित, पुरेसा औषध साठा उपलब्ध करून द्यावा, अन्यथा कोरोना चे महासंकट रोखने मोठे अवघड होऊ शकते. त्याचबरोबर जनतेने देखील मास्क चा वापर, सोशलडिंस्टिंग, घराबाहेर न पडणे हे नियम पाळावेच लागतील, हे लक्षात घ्यावे लागेल. 

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...