मुरबाड मध्ये डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आधार फाऊंडेशन व अखिल मुरबाड प्रा. शिक्षक संघाचे रक्तदान शिबीर संपन्न !!
मुरबाड, (मंगल डोंगरे) : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती* निमित्ताने *आधार फाऊंडेशन सामाजिक संस्था मुरबाड व अखिल मुरबाड तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेच्या* वतीने *पंचायत समिती मुरबाड* येथे रक्तदान शिबीर पार पडले. राज्यात सह संपूर्ण देशभरात पुन्हा कोरोना वाढत चालला आहे.. पेशेंट संख्या वाढत असताना राज्यात रक्ताचा तुटवाडा भासत आहे.त्या अनुषंगाने कोरोना ग्रस्तानां अशा परिस्तिथीत मदत व्हावी. रक्त पुरवठा तात्काळ उपलब्ध व्हावा ह्या उदात्त हेतूने संस्थेच्या वतीने आवाहन केल्यानंतर आज 38 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करण्याची खुप इच्छा असतांना कोरोना प्रतिबंध लस घेतली असल्याने 21 जणांना माघारीही जावे लागले आहे.
या शिबिरास मा.सुभाषदादा पवार उपाध्यक्ष जि. प ठाणे, मा. दिपक पवार सभापती प. स. मुरबाड, श्रीकांत धुमाळ मा. सभापती, मा. संतोष भोसले शिक्षणाधिकारी ठाणे, मा. रमेश अवचार गट विकास अधिकारी, रवींद्र चंदणे आर. पी. आय सेक्युलर, दिनेश उघडे अध्यक्ष आर पी आय (आठवले), मा. श्री कांतीलाल कंटे, शिवसेना तालुका प्रमुख, मा. श्री रामभाऊ दळवी, मा. श्री प्रकाश पवार सर, मा. सौ. लांबटे मॅडम, मा. मोहन भावार्थे, श्री निलेश अहिरे, श्री गोविंद खाटेघरे, श्री. अण्णा इसामे, विजय उंद्रू भोईर .तसेच पत्रकार बंधू मंगलजी डोंगरे, जयदीप आढाएगे, प्रकाश जाधव, किशोर गायकवाड, राजीव चंदणे, सचिन वाघचौडे इत्यादीनी शिबिरास भेट दिली. मान्यवरांनी प्रतिकूल परिस्थिती असतांना संस्थेच्या उत्तम कार्याची प्रशंसा केली. प्रत्यक्ष भेटीने रक्तदात्यांचे अभिनंदन केले.यावेळी *संकल्प ब्लड बँक* च्या वतीने ब्लड संकलन टीमचे ही कौतुक केले.
या शिबिरासाठी संघटनेच्या वतीने श्री. संजय घागस, श्री. कैलास कोर, श्री. नितीन राणे, श्री. महेश देशमुख, श्री. मंगेश इसामे, श्री दीपक देसले, श्री. अनंत विशे, श्री. गजानन भोईर, श्री. जयवंत लाटे, श्री. अरुण गोडांबे,श्री. योगेश चौधरी, श्री. विनोद कोर, श्री. गौतम रातांबे, श्री. विलास शिंदे,श्री. अशोक गोडांबे,श्री. कचरू टेकडे, श्री. दिनेश भावार्थे, श्री.पद्माकर हरड, श्री. लक्ष्मण चोरघे,श्री. संजय घुडे, श्री दिलीप कराळे, श्री दिगंबर पोटे, श्री अमोल शिंदे, श्री. भगवान गायकर, इ मेहनत घेऊन कोरोनाचे नियम पाळून रक्तदान शिबीराचे उत्तम नियोजन केले होते.
अखिल मुरबाड प्राथमिक संस्थेचे अध्यक्ष तथा आधार फाउंडेशन चे सचिव श्रीयुत नितीन राणे सरांनी यापुढे असेच सामाजिक कार्य संस्था व संघटनेच्या माध्यमातून होत राहतील असे सांगितले.

No comments:
Post a Comment