डॅा.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने काँग्रेस कमिटीचे रक्तदान शिबिर संपन्न !!
मुरबाड, (मंगल डोंगरे) :
बुधवार, दि.१४ एप्रिल २०२१ रोजी विश्वरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने मुरबाड तालुका काँग्रेस कमिटी आयोजित रक्तदान शिबिर तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच रिपाइं सेकुल्यरचे जिल्हाध्यक्ष रविंद्र चंदने, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष संघजा मेश्राम, ओ.बी.सी सेलचे जिल्हाध्यक्ष दिनेश सासे, जेष्ठ नेते पुंडलिक चहाड सर, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष नरेश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्व.शांतारामभाऊ घोलप सभागृह, काँग्रेस भवन, मुरबाड येथे संपन्न झाले.
राज्यामध्ये रक्ताचा साठा कमी असल्यामुळे काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांनी डॅा. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने राज्यव्यापी रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा व तालुका स्तरीय करण्याचे निर्देश दिले होते. त्याचा भाग म्हणुन मुरबाड तालुक्यामध्ये सदरच्या शिबिराचे आयोजन केल्याचे चेतनसिंह पवार यांनी प्रतिपादन केले. यावेळी 42 रक्त दात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. ज्यामध्ये स्वतः तालुका अध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी ही रक्तदान केले. "चेतनसिंह पवार" यांनी आतापर्यंत तब्बल 18 वेळा रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य बजावले आहे. तर सदरील उपक्रम यशस्वी करण्यासाठी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष संध्या कदम, युवकचे तालुकाध्यक्ष धनाजी बांगर, महिला शहराध्यक्ष शुभांगी भराडे, विचारमंचचे शहराध्यक्ष गणेश खारे, तालुका उपाध्यक्ष नेताजी लाटे, तालुकासंघटक अमोल चोरघे, विद्यार्थी नेते स्वप्निल जाधव आदींनी प्रचंड मेहनत घेतली. तर सदर शिबीरास झुंजार आंदोलक रमेश हिंदुराव सर, जेष्ठ पत्रकार मंगलजी डोंगरे, श्याम राऊत,जयदिप अढाइगे यांनी भेट दिली. मुरबाड तालुक्यात काँंग्रेस पक्ष बळकट होत असुन, अनेक समाजोपयोगी कार्यक्रम सातत्याने राबविले जात आहेत.
भविष्यामध्ये जास्तीत जास्त समाजोपयोगी कार्यक्रम करुन काँग्रेसचे विचार घराघरात पोहचविणार असल्याचे मत यावेळी संध्या कदम यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment