Saturday, 1 May 2021

बातमी च्या दणक्यानंतर आमदारांसह इतर लोकप्रतिनिधींना आली जाग, लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी !!

बातमी च्या दणक्यानंतर आमदारांसह इतर लोकप्रतिनिधींना आली जाग, लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी !!


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील आणि उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या म्हारळ, वरप आणि कांबा गावातील नागरिकांना संकट काळात येथील लोकप्रतिनिधींनी वा-यावर सोडले अशा मथळ्याखाली पत्रकार संजय कांबळे यांनी विविध बातम्या प्रसिद्ध केल्या. याची दखल घेऊन आमदार कुमार आयलाणी, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख, सरपंच व सदस्यां यांनी या परिसरात लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी केली आहे.  उशिरा का होईना यांना येथील जनतेची अडचण लक्षात आली. त्यामुळे देर आये, दुरुस्त आये, असे म्हणायला हरकत नाही.
कल्याण तालुक्यातील म्हारळ वरप कांबा या गावाची अवस्था ना घर ना घाट का अशी झाली आहे. कारण गावे कल्याण तालुक्यात, पंचायत समिती कल्याण, तहसील कल्याण, पोलिस ठाणे कल्याण. आणि मतदारसंघ उल्हासनगर! म्हारळ ची तर अवस्था खूपच बिकट कारण यांचे रेशनिंग पण उल्हासनगर मध्ये. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना अनेक अडचणी येतात.
मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे या गावांना मोठा फटका बसला, येथील आरोग्याच्या दृष्टीने सोईसुविधा मिळाव्यात म्हणून वरप येथे कोरोना कोविड सेंटर सुरू आले. त्यावेळेस एकाही लोकप्रतिनिधींनी या गावाकडे लक्ष दिले नाही. सुदैवाने कोरोनाचे संकट कमी झाल्याने याकडे लोकांनी दुर्लक्ष केले. परंतु आता कोरोनाची दुसरी लाट आली. येथील नागरिकांना औषध उपचार घ्यायचा असेल तर ग्रामीण रुग्णालय गोवेली किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र दहागाव येथे १०/१५ किलोमीटर अंतरावर जावे लागते आहे. त्यातच आता लसीकरण सुरू झाले आहे. यासाठी गोवेली किंवा दहागाव येथेच जावे लागते. त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत कोणत्याही लोकप्रतिनिधी, पक्ष अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा इतर कोणी लक्ष दिले नाही. त्यामुळे जनता यांच्या वर प्रचंड चिडली आहे. यातूनच वरप ग्रामपंचायतीचे उपसरपंच निलेश कडू, म्हारळ ग्रामपंचायत हद्दीतील समाजसेवक दत्तू सांगळे यांनी आमदार कुमार आयलाणी यांना जाब विचारला. तश्या विविध प्रकारच्या बातम्या पत्रकार संजय कांबळे यांनी प्रसिद्ध केल्या. यातून लोकप्रतिनिधी ची जनतेप्रति बांधिलकी काय, हे वास्तव मांडले. याची दखल उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुमार आयलाणी यांनी घेऊन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठवून म्हारळ वरप कांबा येथील नागरिकांसाठी वरप येथील कोरोना कोविड सेंटर मध्ये लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी केली आहे. आमदार कुमार आयलाणी यांना दोन वेळा कोरोना झाला आहे. त्यामुळे कदाचित या भागाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले असावे? परंतु त्यांची यंत्रणा आहेच ना याचीही विचार त्यांनी करायला हवा,
या बातम्या नंतर शिवसेनेचे उपतालुका प्रमुख दत्ता भोईर, म्हारळ ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती प्रगती प्रकाश कोंगिरे, वरप ग्रामपंचायतीच्या सदस्यां दिपाली भोईर आदींनी खासदार श्रीकांत शिंदे यांना पत्र लिहून या परिसरात लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे उशिरा का होईना आमदार कुमार आयलाणी सह इतर लोकप्रतिनिधी ना जनतेच्या अडचणी कळल्या हे ही कमी नाही. त्यामुळे देर आये असे म्हणायला हरकत नाही,
परंतु केवळ पत्र देऊन चालणार नाही, कारण कोरोनाची परिस्थिती खूपच बिकट आहे. आपल्या भागात रोज पेंशट वाढत आहेत. कुठेही बेड नाहीत, अत्यंत जवळचे मित्र, नातेवाईक मरत आहेत. यावर एकमेव उपाय म्हणजे "लसीकरण" हे होय. त्यामुळे ते लवकरात आहे आपल्या परिसरात कसे सुरु करता येईल, यासाठी आवश्यक आरोग्य अधिकारी व कर्मचारी, जागा, मुबलक लसीची साठा, याचाही विचार करुन आमदार महोदय व खासदार यांनी सातत्याने पाठपुरावा करायला हवा. आणि नागरीकांनी देखील जागृतपणे त्यांच्या पाठीशी असायला हवे. तरच तिसऱ्या लाटेचा आपण समर्थपणे मुकाबला करू शकतो.

No comments:

Post a Comment

"चिरंजीवी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सलोनी (अवली) तोडकरी ह्याचे "बालपण वाचवा मानवता वाचवा" यासाठी विक्रमगड येथे ३ दिवसीय लाक्षणिक उपोषण !!

"चिरंजीवी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सलोनी (अवली) तोडकरी ह्याचे "बालपण वाचवा मानवता वाचवा" यासाठी विक्रमगड येथे ३ दिवसीय ल...