सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांच्या पाठपुव्याला यश; गीतांजली नाला मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दुरुस्तीला सुरुवात !
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी पूर्व गीतांजली रेल्वे कॉलनी जवळील गीतांजली नाला मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दुरुस्तीसाठी २७ फेब्रुवारी रोजी तोडण्यात आला होता व जवळपास दोन महिने येथील काम पूर्णपणे ठप्प झाले होते.अशावेळी सर्वप्रथम स्थानिक सामजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी ही गोष्ट के पूर्व विभागाचे अभियंता ( ब्रिज ) प्रफुल लोटे यांच्या लक्षात आणून दिली. हे काम का एवढे दिवस का रखडले आहे व ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे असून येथुन प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या अडचणी काय आहेत हे लक्षात आणून दिले. त्यावेळी आमच्याकडे सदर कामासाठी अँप्रोवल व नाल्याची डिझाईन तयार करण्यासाठी लॉकडाउन असल्याने वेळ लागत असल्याचे उत्तर लोटे यांनी हिरवे यांना दिले. यास्तव या कामाची सर्व जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची असून काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी हिरवे सातत्याने बीएमसी अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते व काही दिवसांपूर्वी या कामाला सुरुवात झाली असून आम्ही ते लवकरच पूर्ण करू असे आश्वासन अधिकारी लोटे यांनी हिरवे यांना दिले आहे. यासाठी स्थानिक आमदार व माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर व स्थनिक नगरसेवक पंकज यादव, नगरसेविका उज्ज्वला मोडक यांचेही सहकार्य लाभल्याचे गणेश हिरवे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment