जेष्ठ नागरिकांसाठी कोविड- १९ प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर जाण्या- येण्यासाठी मोफत सेवा देणारे संजय महाडिक एक आदर्श "कोविड योध्दा" !
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी भागात जेष्ठ नागरिकांसाठी कोविड- १९ प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर जाण्या- येण्यासाठी मोफत शिवसेना शाखा क्र ७७ चा उपशाखाप्रमुख संजय महाडिक यांनी मोफत वाहनसेवा दिली. स्थानिक आमदार व मा. राज्यमंत्री श्री. रविंद्र वायकर यांनी त्यांच्या या मानवतेच्या कार्याचे कौतुक केले. गेल्या वर्षीपासून संजय महाडिक कोविडच्या काळात दिन -दुबळ्या गरवंत लोकांसाठी जे - जे करता येईल ते -ते सर्व यथाशक्ती करीत आहेत. मध्यंतरी रेमडीसीविर इंजेक्शन मिळविण्यासाठी अनेक ठिकाणी अनेक मार्गानी प्रयत्न करायचे त्यासाठीही संजय महाडिक यांनी अनेकांना ही इंजेक्शने मिळण्यासाठी मोलाची मदत केली. गेल्यावर्षीच्या मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या कडक लॉक डाऊनच्या काळात गरजू व गरीब लोकांना चार घास सुखाचे अन्न मिळण्यासाठी आमदार व माजी राज्यमंत्री श्री. रविंद्र वायकर यांनी गोरगरिबांना व गरजूना धान्य किट तयार करून त्यांच्या घरी पाठवून देण्याचे कार्य जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील सर्व शाखांच्या माध्यमातून सुरू केले होते.त्याही वेळेला संजयने मोलाची कामगिरी बजावली. सर्वत्र अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता स्वतःची चारचाकी गाडी घेऊन गोरेगाव, मालाड, दहिसर, देवनार ,वांद्रे, बोरोवली, अंधेरी, नाशिक, विरार, पनवेल, नाला सोपारा, कर्जत अलिबाग ,पुणे व संपुर्ण जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात व संपूर्ण मुंबईभरही संजय महाडिक यांनी मदत पोहचवली. भुकेल्या गरजू,गोरगरिबांना अन्न पोहचवले. त्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहिले की संजयला समाधान मिळायचे. संजय महाडिक बोलताना नेहमी सांगतात की, भाई, हे असे काम करताना कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. परप्रांतीय बांधव त्यांच्या राज्यात जाण्याच्या वेळेला देखील संजयने मोलाचे सहकार्य केले. जय महाराष्ट्र ग्रुपच्या माध्यमातुनही या ग्रुप मधील संजय महाडीक, नितिन गायकवाड, महेश पडवळ यांनी मिळेल ती लोकोपयोगी कामे केली व अजूनही हा कार्ययज्ञ अव्याहतपणे चालू ठेवला आहे.कधी - कधी गंमतीने त्यांना विचारायचो की, एवढा उत्साह तुमच्यात कुठून येतो तुम्ही थकत कसे नाहीत ? त्यावर मिश्कीलपणे त्यांचे उत्तर ठरलेले असते गणेश वराडे साहेब" हे फक्त शिवसैनिकच करू शकतो. "हे सर्व करीत असताना ज्याची भीती वाटत होती तेच झाले. संजयला व संपूर्ण कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग झाला व हा वाघ चौदा दिवस घरी विलगिकरणात बंदीस्त झाला. तरीही फोनवरून देखील त्याचे जमेल तेवढे मदत करणे चालू होते. १८ दिवसानंतर पुन्हा नव्या जोमाने संजय घराबाहेर पडला तो अजून जोरदार कार्य करण्याचा निर्धार करूनच. मेडिकल कँप, धान्य वाटप, रूग्णांना हॉस्पिटल मध्ये पोहचवणे, लहान मुले लॉक डाऊन मुळे नातेवाईक यांच्या कडे अडकली होती त्यांना घरी पोचविणे अशा सर्व प्रकारचे सहकार्य संजय महाडिक करीत राहिले. आजही करत आहेत न पुढेही करतच राहणार आहेत. याच्या या कार्याची दखल घेऊन अनेक संस्थानी त्याला "कोविड योद्धा" म्हणून गौरव केला.अशा या संजय महाडिक नामक ( कोविड योध्दा ) समाजसेवकाला/अन्नदात्याला उत्तम निरोगी आरोग्य लाभून त्याच्या हातून हा जनसेवेचा यज्ञ अविरतपणे चालू राहू दे यासाठी त्यांना गणेश हिरवे व त्यांच्या सहकारी वर्गासह,विविध संस्था,मंडळव प्रतिष्ठान पदाधिकारी तसेच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय प्रतिष्ठीत व्यक्तीसह अनेकांकडून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment