जिल्हा आरोग्य अधिकारी मनिष रेंगे यांची हाकलपट्टी करण्याची आमदार किसन कथोरे यांची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी !!
मुरबाड, {मंगल डोंगरे} :
राज्यात कोरोणा रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून शासन सर्वतोपरी मदत व उपाय योजना राबवत आहे परंतु मुंबईसारख्या उपनगरा पासून हाकेच्या अंतरावर असनाऱ्या ठाणे जिल्ह्यात कोरोणा covid-19 चा प्रादुर्भाव ठाणे जिल्ह्याच्या इतर शहरांपेक्षा ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचे एकमेव कारण ठाणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी *मनिष रेंगे* असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी पत्रात नमूद केले आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोणत्याही उपाययोजना नाही, नियोजन नाही, लसीकरण करण्यात अपयशी, कोणत्याही प्रकारे जनजागृती नाही, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तालुक्यांमध्ये किती रुग्ण संख्या, किती रुग्ण ऍक्टिव्ह, किती रुग्ण पॉझिटिव्ह, किती रुग्ण बरे झाले, किती रुग्णांना बरे झाल्यावर घरी सोडले, पॉझिटिव्ह रुग्णांचा कोणत्या रुग्णालयात उपचार केला किंवा नाही. की पॉझिटिव्ह रुग्ण गावातील इतर नागरिकांना प्रादुर्भाव/ संक्रमित करत आहेत याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कधीच चौकशी अथवा आढावा घेतला नाही जिल्ह्याच्या ठिकाणी दिवसभर बसून असतात त्यामुळे त्यांनी मुरबाड, शहापूर ,भिवंडी, अंबरनाथ, कल्याण ग्रामीण, भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये लसीकरण व कोरोना संक्रमण कमी करण्याबाबत आढावा व ग्रामीण रुग्णालयाच्या भेटी घेतल्या नाहीत त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरुना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून मृत्यू संख्येतही वाढ झालेली दिसून येत आहे त्यामुळे ठाणे जिल्यातील कोरोना covid-19 रुग्णसंख्या वाढीला व नागरिकांच्या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य आरोग्य अधिकारी मनीष रेंगे हेच जबाबदार असल्याच्या कारणाने त्यांची ताबडतोब हकालपट्टी करून त्यांच्या जागी सक्षम असा आरोग्य अधिकारी नेमणूक करावी असे पत्र मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री व कुटुंबकल्याण मंत्री राजेश टोपे तसेच मुख्य सचिव व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना निवेदन पत्र दिले आहे.
No comments:
Post a Comment