Monday, 3 May 2021

मुरबाड तालुक्याला पून्हा गारपिटीचा फटका ! कोरोनाच्या दुसऱ्या लाटे बरोबरच गारपिटीची लाट !

मुरबाड तालुक्याला पून्हा गारपिटीचा फटका !        

कोरोनाच्या दुसऱ्या लाटे बरोबरच गारपिटीची लाट ! 


मुरबाड, (मंगल डोंगरे) :
 
मुरबाड तालुक्यात कोरोना च्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असता नागरिकांना विशेषतः आदिवासी बांधवांना ऊन वारा पाऊस व वादळी वाऱ्यासह  गारपिटीचा  सामना करावा लागत आहे 
 

याबाबत सविस्तर वृत्त असे की रविवार दिनांक 2 मे रोजी अचानक संध्याकाळच्या सुमारास मुरबाड तालुक्याचा व ठाणे जिल्हाचा शेवटचा टोक असलेल्या आल्याचीवाडी, मोधळवाडी, केलेवाडी  वाल्हीवरे, धारखिंड, बांडेशेत याठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा मुसळधार पाऊस झाला या वादळी वाऱ्यासह गारपीटच्या पावसाने आदिवासींच्या घरांची पत्रे व कवले उडवून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपिट एवढ्या मोठ्याप्रमाणात झाली गारांचा खच पडला होता नागरिकांना फावड्याने गारा बाजुला कराव्या लागल्या. उन्हाळी शेती करणारे आदिवासी बांधवावर आता उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे तसेच या वादळी वाऱ्यात व गारपीटच्या पावसाने आंबा बागायतदार व फळभाज्यांचे सूद्धा  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकरी बांधव व आदिवासींच्या घराचे झालेले नुकसानीचे पंचनामे करावे भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांकडून  होत आहे.

No comments:

Post a Comment

विक्रोळी पार्कसाईट मध्ये पर्यायी सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे नागरिकांची होतेय गैरसोय, पालिकेच्या उदासिनतेमुळे नागरिकांमध्ये नाराजी !

विक्रोळी पार्कसाईट मध्ये पर्यायी सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे नागरिकांची होतेय गैरसोय, पालिकेच्या उदासिनतेमुळे नागरिकांमध्ये नाराजी ! ...