गारपिटीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबाना जीवनावश्यक वस्तुसह अर्थसहाय्य देणार - 'आमदार किसन कथोरे'
" मुरबाड मधिल आदिवासी बांधव सापडला कोरोना पाणी टंचाई व गारपिटीच्या तिहेरी संकटात !!
मुरबाड, (मंगल डोंगरे) :
कोरोना महामारी मुळे भयभीत झालेले नागरिक हे सध्या जीव मुठीत धरुन आपली उपजीविका करत असताना काल झालेल्या वादळी पावसाने व गारपिटीने नुकसान झालेल्या पिडित कुटुंबाना जीवनावश्यक वस्तु तसेच आर्थिक मदत लवकरच देण्यात येईल, असे आश्वासन आमदार कथोरे यांनी दिल्याने पिडित कुटुंबाना दिलासा मिळाला आहे.
अवकाळी पावसाने मुरबाड तालुक्यातील आल्याची वाडी, मेर्दी, न्याहाडी, मोधळवाडी, कोळेवाडी, वाल्हीवरे परिसरात रविवारी सायंकाळी हजेरी लावली असता, जोरदार आलेल्या वादळवाऱ्याने सुमारे 150 घरांचे नुकसान झाले असुन सुमारे दहा ते पंधरा घरांचे शंभर टक्के नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार अमोल कदम व आमदार किसन कथोरे यांना समजताच त्यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली व प्रत्यक्ष घरांनी आणि पिडित कुटुंबाची पाहाणी केली असता या गारपिटीमुळे अनेक कुटुंबांना झळ पोहचली असल्याने त्यांनी प्रत्येक घरांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना तातडीने जीवनावश्यक वस्तु तसेच मोफत धान्य पुरवठा तसेच आर्थिक मदत करण्याचे आश्वासन आमदार किसन कथोरे यांनी दिले.
दरम्यान गेले दोन वर्षे कोरोना या महामारीने सर्वसामान्य जनतेचा रोजगार हिरावल्याने पोटभर इ मिळणे अवघड झाले असताना सालाबादप्रमाणे भेडसावणारी पाणी टंचाई मुळे पिण्याचे पाणी देखील मुश्किल झाले असून काल झालेल्या वादळी पावसाने व गारपिटीमुळे घरांचे छप्पर देखील उडुन गेले असल्याने आदिवासी बांधव हा कोरोनामुळे अन्य,तर पाणीटंचाई मुळे पिण्याचे पाणी व वादळी पावसामुळे छप्पर उडुन गेल्याने तिहेरी संकटात सापडला आहे.
No comments:
Post a Comment