महाराष्ट्राला मोठा दिलासा; रुग्णसंख्येत घट ! "लॉकडाऊनचे दिसू लागले सकारात्मक परिणाम"
मुंबई: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. कारण राज्यातील आज नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 10 हजारांनी जास्त आहे. राज्यात आज दिवसभरात 59 हजार 500 कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर गेल्या 24 तासांत राज्यात 48 हजार 621 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात आज 567 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या आकडेवारीसह राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 40 लाख 41 हजार 158 झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84.7 टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर एकूण कोरोना रुग्णांची संख्या 47 लाख 71 हजार 22 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 39 लाख 8 हजार 491 जण होम क्वारंटाईन आहेत. तर 28 हजार 593 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्याच्या स्थितीत 6 लाख 56 हजार 870 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment