पदोन्नतीतील आरक्षणासाठी अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्रभर आंदोलन छेडणार...!
*प्रदेश अध्यक्ष मा.रविंद्रदादा जाधव यांचे प्रतिपादन*
नाशिक (प्रतिनिधी) दि.१६ -: ७ मे रोजी पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा महाराष्ट्र राज्य सरकारने जारी केलेला शासन निर्णय राज्यघटनेच्या तरतुदींचा भंग करणारा आहे. हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी महाराष्ट्रातील सर्व दलीत संघटना, व पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर दबाव आणण्याची गरज असून या निर्णयाविरुद्ध अन्याय अत्याचार निर्मुलन समिती व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा समितीचे प्रदेश अध्यक्ष व रिपाईचे राज्य उपाध्यक्ष मा.रविंद्रदादा जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या शासन निर्णयाविरुद्ध सर्व पातळीवर आंदोलन छेडण्याचा निर्धार आज अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या वतिने घेण्यात आला. १९७४ पासून लागू असलेल्या पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात आंदोलनाची पुढील रुपरेषा कशी असावी, यावर चर्चा करण्यासाठी अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी व जिल्हाध्यक्षांची झुम मिटींग समितीचे प्रदेश अध्यक्ष मा.रविंद्रदादा जाधव यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष प्रा.प्रेमलताताई जाधव, प्रदेश सरचिटणीस मा.अण्णासाहेब पंडीत, प्रदेश सचिव मा.सरस्वती बागुल, प्रदेश सल्लागार अँड.बाळासाहेब जंगम, मा.भिमराव मेश्राम, पुणे जिल्हाध्यक्ष मा. स्मिताताई दातीर, अहमदनगर जिल्हाध्यक्षा मा.रमादेवी धिवर, नाशिक जिल्हाध्यक्षा मा. मनिषाताई पवार, जळगांव जिल्हाध्यक्षा एँड.सिमाताई जाधव, ठाणे जिल्हाध्यक्ष मा. अण्णा साळवे, औरंगाबाद जिल्हाध्यक्षा मा. विद्याताई पगारे, नांदेड जिल्हाध्यक्ष मा. प्रकाशभाऊ वाघमारे, कोकण विभागीय अध्यक्ष मा.संतोष चाळके, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा.ममताताई पुणेकर, उ.महा. उपाध्यक्ष मा.वसंतराव वाघ, बुलढाणा जिल्हाध्यक्ष मा. प्रितीताई शेगावकर, विदर्भ प्रमुख मार्गदर्शक.उमेश इंगळे, नागपूर जिल्हाध्यक्षा मा.अनिता मेश्राम , सोलापूर जिल्हाध्यक्ष, नंदुरबार जिल्हाध्यक्ष मा.गणेश शिरसाठ, परभणी जिल्हाध्यक्ष मा. रेखाताई आवटे, जालना जिल्हाध्यक्ष मा. रतन शिरसाठ, बिड जिल्हाध्यक्ष मा.महेंद्र अढांगळे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष मा.राजेश ढोले ,आदी. उपस्थित होते.
यावेळी या शासन निर्णयामागची स्पष्ट भूमिका व पुढील काळात या निर्णयाच्या परिणामाची मूलभूत मांडणी प्रो.प्रेमलताताई जाधव यांनी केली. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षणाच्या संदर्भात २००१ पासून प्रयत्न केले होते. याचा परिणाम म्हणून २००४ मध्ये तसा ठराव महाराष्ट्र विधानसभेने संमत केला होता. त्यानुसार २५ मे २००४ रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला. या शासन निर्णयाला आव्हान देण्यात आले. या संदर्भात राज्य सरकारची विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना राज्य सरकारने गेल्या ७ मे रोजी हा शासन निर्णय जारी केल्याने राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीवर गंडांतर आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाई पक्ष नेहमीच मागासवर्गीयांच्या हिताचा विचार करत असते असे समितीचे प्रदेश सल्लागार एँड.बाळासाहेब जंगम म्हणाले, काही दिवसांपुर्वि मा.ना.रामदासजी आठवलेसाहेब यांनी राज्यपाल व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची समक्ष भेट घेऊन निवेदन देवुन मागासवर्गीयांच्या हितांचे रक्षण करण्याचे आवाहन केले असे मत रविंद्रदादा जाधव यांनी मांडले व त्यासाठी समितीच्या वतिने मागासवर्गीयावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ठोस पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले होते.
लवकरच लाॅकडाऊन नंतर अन्याय अत्याचार.नि.समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ आघाडीचे नेते मा.शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विद्युत मंत्री नितिनजी राऊत यांची भेट घेऊन सबंधित जी.आर. कसा घटनाविरोधी आहे हे पटवून देण्यासाठी जाणार असल्याचा ठराव संमत करण्यात आला. तसेच प्रत्येक जिल्ह्य़ात अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या जिल्हाध्यक्षांनी व पदाधिकाऱ्यांनी मा. विभागीय महसूल आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने द्यावीत, असा आदेश प्रदेश अध्यक्ष मा.रविंद्रदादा जाधव यांनी दीला.
या झुम मिटींगचे संचालन अहमदनगर जिल्हाध्यक्ष मा. रमादेवी धिवर यांनी केले तर आभार नाशिक जिल्हाध्यक्ष मा. मनिषाताई पवार यांनी मानले.
या झुम मिटींगला उ.महाराष्ट्र.सरचिटणीस मा
रफीक सैयद,उ.म. कोषाध्यक्ष मा. टीकुभाई कोहली, नाशिक जिल्हा कोषाध्यक्ष संदीप साबळे, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष मनिषाताई म्हसदे, सरचिटणीस मा.मिराताई डोळस, जिल्हा उपाध्यक्ष मोहीनीताई डावरे, वर्षाताई आहीरे, जळगांव जिल्हा कार्याध्यक्ष मनिषाताई पाटील, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनीताताई सोनार, लतीका पगारे, शशीभाऊ जाधव, संदीप भालेराव, एँड.असुदीप पाटील, रेखा जाधव, राजु सोनवणे, प्रकाश गांगुर्डे, विनोद गायकवाड, नितीन खडताळे, संदीप गांगुर्डे, नितिन ढेंगळे, आदींसह बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी झुम मिटींग वर उपस्थिती दर्शविली.
No comments:
Post a Comment