पवार बंधूंनी दिला जेष्ठ नागरिकांना मदतीचा हात !
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
कोविड-१९ या महामारी काळात प्रत्येकजण आपआपल्या परीने जी काही मदत करता येईल ती करत होता. मुंबईल रहिवाशी पवार बंधूंही याही याला अपवाद नाहीत. त्यांनी आवश्यक तेथे जी-जी गरज होती तेथे तेथे गरजेनुसार मदतीचा हात दिला. आज दि.१६ मे २०२१ रोजी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पवार व अभिजीत पवार या बंधूनी यांनी जागतिक परिवार दिनाच्या निमित्ताने घाटकोपर अमृतनगर येथील जेष्ठ नागरिक याना साखर, चहापावडर, कोलगेट, साबण व मास्क देऊन सहकार्य करुन हा दिवस एका वेगळ्या पद्धतीने साजरा केला. या आधी देखील गेल्यावर्षी लॉकडाउन सुरू झाल्याबरोबर जेथे जेथे मदतीची आवश्यकता होती तिथे तिथे प्रवीण व त्यांचे बंधू अभिजीत पवार यांनी सहकार्य केले असून मुख्यमंत्री सहायता निधीत देखील योगदान दिलं आहे. जेष्ठ नागरिकांना मदत केलेल्या या उपक्रमाबद्दल जेष्ठ नागरिकांनी पवार कुटुंबियांचे आभार मानून त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत असा आशीर्वाद देखील दिला.
No comments:
Post a Comment