Sunday, 16 May 2021

राज्यात आज पुन्हा रुग्णसंख्येत घट ! लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम !! तरी मृत्यूचा आकडा चिंताजनक !!!

राज्यात आज पुन्हा रुग्णसंख्येत घट ! लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम !! तरी मृत्यूचा आकडा चिंताजनक !!!


मुंबई : महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत. राज्यात रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत 34 हजार 389 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर 59 हजार 318 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. असे असले तरी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 974 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतलाय. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 81 हजार 486 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात 53 लाख 78 हजार 452 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 48 लाख 26 हजार 371 रुग्णांनी कोरोनावर मात केलीये. राज्यात सध्या 4 लाख 68 हजार 109 कोरोनाचे सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

No comments:

Post a Comment

प्रसिद्ध अभिनेते देव गिल यांनी केली करोडों रुपयांची फसवणूक !!

प्रसिद्ध अभिनेते देव गिल यांनी केली करोडों रुपयांची फसवणूक !! पुणे, रवी भिसे : प्रसिद्ध अभिनेते देव गिल यांच्या देव गिल प्रोडक्श...