कल्याण पंचायत समितीचे उपसभापती किरण ठोंबरे यांनी जुन्या जाणत्या शिवसैनिकांच्या उपस्थित स्विकारला पदभार!
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण पंचायत समितीच्या उपसभापती पदाची निवडणूक जिंकल्यावर आज खोणी गणाचे किरण चंदूशेठ ठोंबरे यांनी जुन्या जाणत्या शिवसैनिकांच्या उपस्थित उपसभापती पदाचा पदभार स्वीकारला.
यावेळी त्यांचे सहकारी सदस्य व प्रशासनाने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर आपण सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा श्रीकांत शिंदे, कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासात्मक कामे करणार असे यावेळी उपसभापती ठोंबरे यांनी सांगितले.
कल्याण पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता आहे. भाजपाचे सर्वाधिक सदस्य असताना ही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी त्यांना सत्तेपासून दूर ठेवले होते. पण शिवसेनेचे माजी उपसभापती रमेश बांगर यांच्या विरोधात सेनेचे खोणी गणातील सदस्य किरण ठोंबरे यांनी बांगर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. यावेळी एकूण १२ सदस्यांपैकी तब्बल १० सदस्यांनी यावर सह्या केल्या होत्या. हे सर्व प्रकरण किरण ठोंबरे यांनी घडवून आणल्याने तेच उपसभापती पदाचे प्रबळ दावेदार होते. तसेच १० सदस्यांच्या सह्यां असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असे वाटत असतानाच खा श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी याच गणातील किरण ठोंबरे व भरत भोईर यांना भेटायला बोलावलं. परंतु यामध्ये काहीतरी वेगळं शिजतय असे वाटल्याने ठोंबरे यांनी सावध पवित्रा घेतला. त्यामुळे जिल्हाप्रमुख व खासदार यांनी पक्षाचा विहप काढला. आणि अधिकृतरीत्या भरत भोईर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अधीच सावध असलेल्या ठोंबरे यांनी भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसभापती पदाची निवडणूक ६ विरूध्द ५ अशी निवडणूक जिंकली. त्यामुळे किरण ठोंबरे यांनी शिवसेनेला डावलून ही निवडणूक जिंकली असे काही सेना सदस्य सांगत होते. परंतु आपण शिवसेनेचाच उपसभापती असल्याचे किरण ठोंबरे यांनी ठासून सांगितले. इतकेच नव्हे तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा आपल्याला आशिर्वाद व पाठिंबा असल्याचेही सांगण्यास ते विसरले नाहीत.
आज मंलगपट्टा परिसरातील शिवसेनेचे जुने जाणते शिवसैनिक गोमा आंबो भोईर, शिवसेनेचे विभाग प्रमुख गणेश ठोंबरे, शाखाप्रमुख गुरुनाथ पाटील, उपशाखाप्रमुख जयवंत म्हात्रे, रामदास ठोंबरे, यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पदभार स्वीकारला. यावेळी माजी सभापती दर्शना जाधव, माजी उपसभापती पांडुरंग म्हात्रे, भाजपाचे जयवंत भोईर, केतन देशमुख, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष देविदास चौधरी, कल्याण तालुका ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अजय जाधव, खोणी ग्रामपंचायतीचे सरपंच शांताराम ठोंबरे, उपसरपंच योगेश ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भगवान पाटील, गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भारत मासाळ, खोणी चे ग्रामविकास अधिकारी दिलीप जागरे, तूषार पाटील, सर्व विस्तार अधिकारी, आणि पत्रकार संजय कांबळे यांनी उपसभापती किरण ठोंबरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा श्रीकांत शिंदे, आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन तालुक्यात विकासात्मक कामे पूर्ण करणार असल्याचा मनोदय उपसभापती किरण ठोंबरे यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment