Monday, 17 May 2021

भिवंडीत चक्रीवादळाचा तडाखा, घर झाले जमीनदोस्त,जीवितहानी नाही !

भिवंडीत चक्रीवादळाचा तडाखा, घर झाले जमीनदोस्त,जीवितहानी नाही !


अरुण पाटील,भिवंडी :
          रविवारी संध्याकाळ पासूनच सोसाट्याचा वारा वाहू लागला असून नंतर रात्री वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड सुरू असून काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. अश्याच प्रकारे भिवंडी तालुक्यातील शेलार येथे  वादळ, वारा आणि पावसामुळे घरं कोसळले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गरिबाचा संसार उघड्यावर पडला आहे.
         भिवंडी तालुक्यात सुरू असलेल्या वादळी वारा आणि पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली आहे. शेलार गावच्या हद्दीतीलअसलेल्या  बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये एक संपूर्ण घरच कोसळले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र नुकसान मोठे झाले आहे. या घरात अडकलेल्या दोन जणांना स्थानिक नागरिकांनी  सुखरूप बाहेर काढले असून घर कोसळल्याने कुटुंबाला मात्र उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.त्यामुळे आता कोरोनाचे संकट सगळीकडे असतानाच आता बेघर झाल्याचे संकट त्याच्यावर  आहे.

No comments:

Post a Comment

प्रसिद्ध अभिनेते देव गिल यांनी केली करोडों रुपयांची फसवणूक !!

प्रसिद्ध अभिनेते देव गिल यांनी केली करोडों रुपयांची फसवणूक !! पुणे, रवी भिसे : प्रसिद्ध अभिनेते देव गिल यांच्या देव गिल प्रोडक्श...