आपटी गावातील शेतकरी विकास शिसवे यांचे भाताचे सरले अज्ञाताकडून जाळले, लाॅकडाऊण काळात मोठे नुकसान?
कल्याण (संजय कांबळे) कोरोनाच्या संकटामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या कल्याण तालुक्यातील आपटी गावचे शेतकरी विकास बळीराम शिसवे यांचे शेतात ठेवलेले सुमारे ७०० /८०० भाताचे सरले /भारे कोणी अज्ञाताकडून जाळण्यात आले असून यामुळे या शेतकऱ्यांचे ७० ते ८० हजाराचे नुकसान झाले आहे.
कल्याण तालुक्यात कोरोनाच्या संकटामुळे सर्वच क्षेत्रे बाधित झाली आहेत. तालुक्यात उल्हास, बारवी, काळू आणि भातसा या चार नद्या असल्याने शेतकरी शेती बरोबरच दुग्ध व्यवसाय व भाजीपाला हे व्यवसाय करतात. गेल्या वर्षी पासून देशात कोरोना मुळे लाॅकडाऊण व आता संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले पण खर्च देखील निघाला नाही. त्यामुळे आता दुग्ध व्यवसायाचा आधार मिळाला. म्हैशी व गाय यांच्या तबेल्यासाठी भाताचा पेंडा हे उत्तम खाद्य असल्याने काही शेतकऱ्यांनी भातपिक निघाल्यावर लगेच हे सरले विकले. ४०/५०/६०/७० रुपये पर्यंत एका सरल्याला मिळत होते. त्यामुळे अजून थोडे थांबलो तर चांगला भाव मिळेल. या अपेक्षेने आपटी गावातील शेतकरी विकास बळीराम शिसवे यांनी आपल्या शेतातच भाताचे ७०० /८०० सरले ठेवले होते. पण काल कोणी तरी अज्ञाताने याला आग लावली. क्षणार्धात सर्व पेंडा जळून खाक झाला. सुमारे ७०/८० हजारांचे नुकसान झाल्याचे विकास शिसवे यांनी सांगितले.
तालुक्यातील आपटी गाव हे उल्हास नदीच्या काठावर वसलेले आहे. शेती हा मुख्य व्यवसाय येथील लोकांचा आहे. गाव तसे शांतता प्रिय आहे. परंतु निवडणूकामुळे गावाची शांतता हरवली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे आधीच जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला असताना, भाताचा पेंडा विकून चार पैसे मिळतील असे वाटत होते. पण कोणीतरी डाव साधला. त्यामुळे शासनाने याचा पंचनामा करून झालेले नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिसवे यांनी केली आहे. तर याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे असे विकास शिसवे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment