Thursday, 13 May 2021

लताई कोविड केअर सेंटरला मुंबईतील मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे विश्वस्त डॉ.मनोजभाऊ चव्हाण यांच्या हस्ते वैद्यकीय साहित्याची मदत !

लताई कोविड केअर सेंटरला मुंबईतील मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे विश्वस्त डॉ.मनोजभाऊ चव्हाण यांच्या हस्ते वैद्यकीय साहित्याची मदत !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
              महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बीड जिल्ह्यातील जिल्हाअध्यक्ष श्री. सुमंत धस यांनी उभारलेल्या ५० खाटांची क्षमता असलेले, केज तालुक्यातील लताई कोविड केअर सेंटरला मुंबईतील मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट च्या वतीने ट्रस्ट चे विश्वास्त डॉ.मनोजभाऊ चव्हाण यांच्या हस्ते कोविडच्या उपचारासाठी शासनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मागणी केलेली औषधे, पीपीई किट, फेस शिल्ड, सेनीटायझर, इत्यादी वस्तूंची मदत करण्यात आली.या प्रसंगी श्री. कल्याण केदार, श्री. संदीप परब, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर धोडके व कर्मचारी उपस्थित होते. या सुविधा उपलब्ध करण्यासाठी "मस्त" म्हणजेच मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष श्री.अमित बने, विश्वस्त श्री. विनोद शिंदे (विक्रोळी विधानसभेचे विभागाध्यक्ष) यांचे विशेष सहकार्य लाभले.या उपक्रमाचे अनेकांकडून कौतुक होत असून मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट चे विश्वस्त डाँ. मनोजभाऊ चव्हाण यांना पुढील वाढचालीस व अशीच सेवा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून आधारकार्ड नोंदणी शिबीर संपन्न !

स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून आधारकार्ड नोंदणी शिबीर संपन्न ! **शिबिरात आधारकार्ड नोंदणी व अद्यायावत करण्यासाठी नागरीकांची गर्दी **तसेच ब प्र...