राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना सानुग्रह अनुदानासाठी फार्म भरण्याची आवश्यकता नाही !
मुंबई : राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वीच महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. तथापि, परवानाधारक रिक्षा चालकांकडून काही प्रतिनिधी संघटना मॅन्युअल पद्धतीने फॉर्म भरून घेत आहेत, अशा तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयास प्राप्त होत आहेत. सानुग्रह अनुदान परवानाधारक रिक्षा चालकांना त्यांच्या थेट बँक खात्यात देण्यासंदर्भात पोर्टल तयार करण्याचे काम परिवहन आयुक्त कार्यालय स्तरावर सुरू आहे.
ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू झाल्यानंतर सर्व संघटना व रिक्षाचालकांना याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे सूचित केले जाईल. यासाठी मॅन्युअल पद्धतीने फॉर्म भरून घेणे किंवा अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे परिवहन उपायुक्त यांनी कळविले आहे.
रिक्षा चालकांना ऑनलाईन पद्धतीने स्वानुग्रह मदत चालू झाल्याच्या सूचना दिल्या जातील असे सरकारचे आश्वासन निराधार आहे..
ReplyDeleteसंपूर्ण परमिट धारक रिक्षा चालकांचा बायोडाटा काढण्यात सरकारला या कोरोना महायुद्धात शक्य होणार नाही. परत काही महिन्यांनी हाच मुद्दा वर येऊन सरकार तर्फे काही दुसरे कारण सांगितले जाईल.
शेवटी-पालथ्या घड्यावर पाणी
शेवटी रिक्षचालकांनी फॉर्म भरून सबमिट करनेच योग्य
Bhau pan from bharayla gelo tari 100/200 te ghetil..
DeleteDhanyawad pan 1500 Kay hoil..
ReplyDeleteGadi cha emi 6000 cha aahe..