भिवंडी-पडघा ग्रामपंचायतीकडून हायपोक्लोराईडची फवारणी !
अरुण पाटील, भिवंडी :
भारत देशासह संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असून पडघा गावाचे सरपंच श्री अमोल सुधाकर बिडवी हे ग्रामपंचायतिच्या माध्यमातून
अयोग्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवत उत्कृष्ट काम करत असताना देखील काही समाज कंटक करत असलेल्या कामाचे राजकारण करताना
दिसत आहे.
भिवंडी -पडघा गावात कोरोना महामारीचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने सोडियम हायपोक्लोराईड ची नियमीत फवारणी होत आहे. तसेच मुख्य म्हणजे पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत कमेटी व कर्मचारी यांनी सुरु केलेल्या दंडात्मक कारवाई मूळे कोविड रुग्णांच्या संख्येवर आळा बसला आहे.परंतु काही समाज कंटक या कोरोना महामारीच्या काळातही आरोग्याच्या विषयाकडे गंभीरतेने न बघता गटा ताटाच्या राजकारणात मग्न आहेत.त्यामुळे गावात या समाज कंटका विरोधात नाराजीचे सुर उमटतं आहे.
पडघा परिसराचा विचार करता पडघा हे बाजारहाटचे मध्यवर्ती ठिकाण आहे.त्यामुळे बाजारपेठेतील गर्दीवर आळा घालण्यासाठी बाजार पेठेत दुचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.त्यामुळे बाजारात गर्दी कमी होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भावही कमी आहे.
सरपंच अमोल बिडवी यांनी उपसरपंच अभिषेक नागावेकर, ग्रा. प.सदस्य शैलेश बिडवी, रविंद्र विशे व इतर ग्रा. प. सदस्य व व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्री दिनेश गंधे व्यापारी मंडळाचे सदस्य श्री गिरीश पटेल, भरत ठक्कर व इतर छोटेमोठे व्यावसायिकानीं पोलिस निरीक्षक कटके साहेबांची भेट घेऊन कोरोना महामारी विषयी चर्चा केली
त्यावेळी त्यांनी सांगितले की कोविड 19 च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कठोर कारवाई करण्यात येईल, या भूमिकेस व्यापारी मंडळानेही सहमती दर्शविली असून तशी वेळ येणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.
No comments:
Post a Comment