Tuesday, 11 May 2021

म्युकर मायकोसिस, चा ठाणे जिल्ह्यातील पहिला बळी, म्हारळ गावातील? ग्रामीण भाग हादरला!

म्युकर मायकोसिस, चा ठाणे जिल्ह्यातील पहिला बळी, म्हारळ गावातील? ग्रामीण भाग हादरला!


कल्याण, (संजय कांबळे) : कोरोनाच्या महाभयंकर संकटानंतर उद्भवलेल्या म्युकर मायकोसिस या रोगाचा पहिला बळी ठाणे जिल्ह्यातील म्हारळ गावात गेला असून यामुळे कल्याण तालुका पुरता हादरला आहे. तर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायत कायम या ना त्या कारणाने चर्चेचा विषय ठरली आहे. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी "कालरा" चा पहिला रुग्ण याच गावात सापडला होता. गावातील नियोजनशून्य बांधकामे, गटारे, कचरा, सांडपाणी, यामुळे गावात सतत घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. गटारे तुंबल्यामुळे गटारगंगा रस्त्यावरून वाहताना दिसते. ६० ते ८० हजार लोकसंख्या आणि हातावर मोजण्याइतपत कामगार व कर्मचारी यामुळे कामे कशी व किती करणार?लोकांची काय जबाबदारी हे ओळखले पाहिजे. 
कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील ग्रामीण भागात सर्वाधिक कोरोनाचे पेंशट हे याच गावात होते. उल्हासनगर शहराला लागून असलेल्या व झोपडपट्टी एरिया असल्याने येथे गुन्हेगारी देखील मोठ्याप्रमाणात आहे. कोटींची विकासकामे आणि खर्च अशा  सगळ्याच बाबतीत म्हारळ ग्रामपंचायत आघाडीवर आहे. १७ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीवर सध्या शिवसेनेच्या श्रीमती प्रगती प्रकाश कोंगिरे या सरपंच तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीमती अश्विनी निलेश देशमुख या उपसरपंच आहेत.
याच ग्रामपंचायत हद्दीत राहणारे एक ३८ वर्षीय इसमाला अगोदर कोरोना झाला होता. तो डोंबिवली येथील एम्स रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्यात आला होता. त्याला म्युकर मायकोसिस झाला होता. रविवारी ९मे रोजी तो रुग्णालयात दाखल झाला असताना त्याचेवर उपचार सुरू असताना सोमवारी १० मे रोजी मरण पावला. असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भारत मासाळ यांनी सांगितले.
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत आतापर्यंत शेकडो लोकांचा बळी गेला आहे. यातून कसेबसे सावरत असतानाच आता म्युकर मायकोसिस या आजाराने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. ठाणे जिल्ह्यातील जे दोन रुग्ण कल्याण डोंबिवली च्या एम्स रुग्णालयात मरण पावले त्यातील एक हा कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायत हद्दीतील असून यामुळे तालुका हादरुन गेला आहे. तर हा आजार संसर्गजन्य नसल्याने कोरोना होऊ नये म्हणून नागरिकांनी सोशलडिंस्टिंग चे पालन करुन, मास्कचा वापर, सेनिटायझर वापर करावा असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भारत मासाळ यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment

गौरीपाडा परिसरातील पथदिव्यांच्या 'स्फूर्ती फाउंडेशन'च्या मागणीला यश !

गौरीपाडा परिसरातील पथदिव्यांच्या 'स्फूर्ती फाउंडेशन'च्या मागणीला यश ! कल्याण, प्रतिनिधी - गौरीपाडा परिसरातील नागरीकांच्य...